Nashik Leopard News : नाशिक (Nashik) शहर परिसरात बिबट्याचे हल्ले सुरूच असून म्हसरूळ (Mhasrul) येथील बिबट्याच्या हल्ल्याला एक दिवस उलटत नाही. तोच पंचवटी परिसरातील (Panchavti Taluka) तवली फाटा नजीक एकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे नाशिक शहर परिसरात दिवसाला चारदा बिबट्याचे (Leopard) दर्शन होत असल्याने नाशिक हे बिबट्याचे माहेरघरच बनले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह शहर परिसरात बिबट्याच्या (Leopard Attack) हल्ल्याच्या तसेच दर्शनाच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. दरम्यान नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील मोराडे वस्तीवरील थाळकर कुटुंबातील तरुणावर बिबट्याच्या हल्ल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंचवटी परिसरात बोरगडकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तावलीफाट्यानजीक बिबट्याने एका ४६ वर्षीय व्यक्तीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शहरात हारेकल दिवशी बिबट्या आणि नाशिककर आमनेसामने येत असल्याने नाशिक हे बिबट्याचा अधिवासाचा जाणून केंद्रच बनले आहे.
नाशिक शहराजवळील बोरगड (Borgad) परिसरात राहणारे बाळासाहेब जाधव हे तवली फाट्यानजीक गेले होते. यावेळी शिवाचार्य आत्मध्यान फाउंडेशन मंदिराच्या जवळ बिबट्याचे दर्शन झाले. मात्र सुरक्षेच्या दृष्टीने जाधव यांनी बिबट्यास दगड मारल्याने बिबट्याचा चवताळला. बिबट्याने जाधव यांच्या हल्ला केला. या हल्ल्यात जाधव यांच्या डाव्या हातास तीन दात लागले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.
नाशिक बिबट्याचे माहेरघर
बिबट्या आणि नाशिक हे जणू समीकरणच झाले आहे. दर आड दिसाला नाशिक शहर परिसरात कुठे ना कुठे बिबट्याचा हल्ला, किंवा बिबट्याचे दर्शन नित्याचे झाले आहे. दरम्यान काल सकाळच्या सुमारास बिबट्याचा हल्ल्याची हि घटना बोरगड परिसरात घडली आहे. या घटनेत संबंधित जाधव यांनी बिबट्याला दगड मारल्याने बिबट्याने हल्ला केल्याची आरएफओ विवेक भदाणे यांनी दिली आहे. त्यामुळे शहर परिसरात वाढत असलेला मानव बिबट संघर्षात नागरिकांनी देखील सजग असणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले पाऊल कधीकधी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे वनविभागाकडून वेळोवेळी जनजागृती करण्यात येत आहे. याकडे नागरिकांनी लक्ष देणे आवश्यक आहे.
बोरगड परिसरात पिंजरे तैनात
दरम्यान घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी हजर झाले. नाशिक शहर परिसरात बिबट्याचा वववर वाढला असून नागरिकांना सातत्याने याबाबत आवाहन करण्यात येत आहे. तर कालच्या घटनेननंतर परिसरात पिंजरे तैनात करण्यात आले आहेत. तसेच नागरिकांनी वनविभागाने केलेल्या आवाहनाला, जनजागृतीला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे असे आवाहनही वनविभागाकडून करण्यात येत आहे.