Nashik News : दिवसेंदिवस महागाई (Inflation) वाढत असून त्यात पगार वेळेवर नाही. त्यामुळे आशा सेविकांना (Asha Workers) राज्य सरकारने आरोग्य विभागात सामावून घ्या. किमान वेतन देऊन सामाजिक सुरक्षा लागू करा, तसेच मोफत काम करून घेणे बंद करा, असा धडधडीत इशारा देत जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी बुधवारी नाशिक (Nashik) जिल्हा परिषद मुख्यालयावर (Nashik Zilha Parishad) मोर्चा काढला. 


आयटकशी (ITUCK) संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने जिल्हा परिषदेवर बुधवारी दुपारी तिरंगा मोर्चा काढला. गोल्फ क्लब मैदानावरून निघालेला मोर्चा सी.बी.एस., त्र्यंबक नाकामार्गे जिल्हा परिषदेवर आला. जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरच अंगणवाडीसेविकांनी ठिय्या मांडला. अंगणवाडीसेविकांचे प्रश्न, सातत्याने रखडणारे मानधन व अन्य समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी यावेळी आंदोलन आशा सेविकांनी केली.  


केंद्र सरकारने 2018  गट प्रवर्तक च्या मानधनामध्ये वाढ केलेली नाही. कोरोना योध्या आशागट प्रवर्तक चा सन्मान  किमान वेतन देऊन करावा.  येणाऱ्या काळात आमदार, खासदार, केंद्र व राज्य सरकार  चे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा  इशारा दिला आहे. यावेळी उपस्थित आशा सेविकांनी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ युवराज देवरे, डॉ राहुल हाडपे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  आरोग्य अभियान नाशिक, शरद नांगरे जिल्हा आशा गट प्रवर्तक समूह संघटक यांना निवेदन देण्यात आले.


वेळी कोरोना काळात आशा सेविकांनी जिवाची पर्वा न करता घरोघर जाऊन जनजागृती केली. यामुळे आशा सेविकांना ग्रामपंचायत मार्फत दिला जाणारा कोरोना प्रोत्साहन देण्यात यावा. गट प्रवर्तकाकडून मोफत काम करून घेणे बंद करा, महिला योजना कर्मचारी आर्थिक शोषण बंद करा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान आशा सेविकांच्या मागण्या संदर्भांत वेळोवेळी आंदोलने, मोर्चे काढण्यात येतात. मात्र दरवेळी अधिकारी, प्रशासन आशा सेविकांचा मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, शासनाकडून गटप्रवर्तक महिलांचे शोषण कुठपर्यंत होणार असा सवालही यावेळी आशा सेविकांनी केला.


या मागण्या करण्यात आल्या...!
महाराष्ट्र शासनाने आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्याप्रमाणे आशागट प्रवर्तक ना वेतन सुसूत्रीकरण  मध्ये समावेश करा गटप्रवर्तक ना न्याय  द्या. गट प्रवर्तक ना फक्त प्रवास भत्ता दिला जातो. मोफत काम करून घेणे बंद करा. गट प्रवर्तक ना किमान वेतन लागू करा. आशागट प्रवर्तकचे नाव बदलून आशा सुपरवायझर करा. गट प्रवर्तकमधून आरोग्य विभागात 50 टक्के जागाची भरती करावी. गट प्रवर्तकांना पगारी सुट्टी, किरकोळ रजा, बाळंतपण च्या पगारी रजा त्वरित लागू करा. गट प्रवर्तक गाव भेटी वेळी वरिष्ठ अधिकारी सही घेण्यासंदर्भात घेतलेला निर्णय व फोटो सक्ती निर्णय रद्द करा. पंतप्रधान मातृत्व वंदना कार्यक्रम आढावा एएनएम व  MPW कडून घ्या. गट प्रवर्तक ना कोणताही मोबदला मिळत नाही. गट प्रवर्तक ना सन्मानाची वागणूक द्या. आशा सॉफ्टवेअर माहिती भरण्याचा मिळत असलेला मोबदला बंद केला आहे, तो त्वरित चालू करा. आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी चे महाराष्ट्र शासनाने वेतन सुसूत्रीकरण करतांना समान शिक्षण व कामाचे समान स्वरूप असतांना तालुका समूह संघटक(BCM) व जिल्हा समूह संघटक (DCM) यांच्या वेतनात तफावत आहे. याची दखल घेऊन तालुका व जिल्हा समूह संघटक ना न्याय द्यावा.