Nashik News : नाशिकमध्ये (Nashik) पाऊस सुरू झाल्यानंतर साथींच्या आजारांनी (Epidemic Diseases) नागरिकांची डोकेदुखी वाढली असून ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिक शहरात डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
नाशिकमध्ये पाऊस (Rain) सुरु झाल्यापासून शहरातील सिव्हिल हॉस्पिटल (Nashik City Hospital), खाजगी दवाखाने रुग्णांनी भरले आहेत. यात ताप सर्दी, खोकला, पोटदुखी आदी साथींच्या आजारांनी ग्रासलेले रुग्ण वाढत आहेत. यातच आता नाशिकमध्ये ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात डेंग्यूचे 21 रुग्ण सापडले असल्याचे प्रशासन जागे झाले आहे. तर जुलै महिन्यात शहरात 23 डेंग्यूचे प्रकरणे नोंदविण्यात आली होती.
दरम्यान शहरात डेंग्यू, चिकन गुनिया (Chicken Gunia), स्वाइन फ्लू आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. अशातच पावसामुळे सर्दी, खोकला आदी रुग्ण वाढल्यामुळे धोकादायक आजाराचे रुग्ण ओळखणे कठीण झाले आहे. नवीन रुग्णांची भर पडल्याने जानेवारीपासून डेंग्यूच्या रुग्णांची संख्या 94 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब अशी की नाशिक शहरात मात्र ऑगस्टमध्ये चिकनगुनियाचा एकही रुग्ण आढळला नाही.
गेल्या काही दिवसांपासून शहरात मुसळधार पाऊस पडत असून, हेच डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याचे प्रमुख कारण असल्याचे नाशिक महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी मात्र गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रकरणे खूपच कमी असल्याचे सांगितले.
नाशिक महापालिकेने (Nashik NMC) शहरातील डास उत्पत्तीची ठिकाणे ओळखून नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. तसेच जिल्हा आरोग्य प्रशासनाने जुलैमध्ये 23 डेंग्यूच्या रुग्णांची नोंद केली होती, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 185 प्रकरणे होती.
डेंग्यूचे रुग्णसंख्येत घट
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये शहरात डेंग्यूचे 311 रुग्ण आढळले होते, मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शहरात आतापर्यंत केवळ 21 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या विविध उपाययोजनांमुळे यंदा डेंग्यूचे रुग्ण तुलनेने कमी असल्याचा दावा नाशिक महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.
मनपा कर्मचाऱ्यांचे पथक
नाशिक महापालिकेने सर्व 6 विभागात 150 कर्मचार्यांचा समावेश करून पथके तयार केली आहेत. ज्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी साठवण सुविधा आणि पाणी साचणे तपासण्यासाठी घरोघरी भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरी अधिकार्यांनी सांगितले की, त्यांनी शहरवासीयांना डेंग्यू पॉझिटिव्ह टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारीबाबत सूचनाही जारी केल्या आहेत.