(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Income Tax : बांधकाम व्यावसायिकांनंतर आता उद्योजक रडारवर, नाशिकमध्ये आयकर विभागाची कारवाई
Nashik Income Tax : नाशिकमध्ये (Nashik City) पुन्हा एकदा इनकम टॅक्सने छापा (Jalna Income Tax Raid) टाकून मोठी कारवाई केली आहे.
Nashik Income Tax : नाशिकमध्ये (Nashik) मागील काही दिवसांत आयकर विभागाने छापे टाकल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अशातच काहीच दिवसांपूर्वी शहरातील नामांकित बिल्डर्सवर छापे टाकल्याने शहरात खळबळ उडाली होती. सलग चार दिवस हा आयकर विभागाचा ससेमिरा या व्यावसायिकांच्या पाठीमागे होता. अशातच पुन्हा एकदा आयकर विभागाने नाशिकमध्ये धाड टाकल्याचं समोर आले आहे.
नाशिकमध्ये (Nashik City) पुन्हा एकदा इनकम टॅक्सने छापा (Jalna Income Tax Raid) टाकून मोठी कारवाई केली आहे. नाशिक शहरातील नामांकित शारदा मोटर्स कंपनीत आयकर विभागाचा छापा टाकला आहे. आज (19 मे) सकाळी आयकर विभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक कंपनीत धडकले असून कारवाई सुरु आहे. नाशिक शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीत शारदा मोटर कंपनी (Sharada Motors Company) कार्यरत आहे. शारदा मोटर्स कंपनीत चारचाकी वाहनांचे सायलेन्सर आणि एक्सेल बनवले जातात. त्यामुळे नाशिकमध्ये आणखी काही कंपन्यांमध्ये आयकर विभागाकडून चौकशी सुरु असल्याची चर्चा आहे. एकीकडे काही दिवसांपूर्वी शहरातील बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने कारवाई केल्यांनतर आता उद्योजक आयकरच्या रडारवर आल्याचे सांगितले जात आहे.
एकीकडे काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये भल्या पहाटे आयकर विभागाचे (Income Tax) पथक दाखल झाले. त्यानंतर शहरातील, बड्या बांधकाम व्यवसायिकांच्या घर, कार्यालय, बांधकाम साईट्सवर छापे टाकण्यात आले. आयकर विभागाने केलेल्या या कारवाईत निवडण्यात आलेले बांधकाम व्यवसायिक नाशिकसह महाराष्ट्रभरात बांधकाम व्यवसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत. हे बांधकाम व्यवसायिक अनेक दिवसांपासून आयकर विभागाच्या रडारवर होते. मात्र, या बांधकाम व्यवसायिकांकडून कर चुकवेगिरी केल्याचे सबळ पुरावे मिळाल्यानंतर आयकर विभागाने सिनेस्टाईल पद्धतीने छापेमारी केली. त्यानंतर आता नाशिकमधीलच उद्योजक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे दिसते आहे. त्यामुळे आता कारवाईने बांधकाम व्यवसायिकांनंतर नाशिकच नाही तर महाराष्ट्रातील उद्योजकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
पोलीस बंदोबस्तही तैनात
दरम्यान चारचाकी वाहनांचे सायलेन्सर आणि एक्सेल बनवणाऱ्या नाशिकच्या नामांकित शारदा मोटर्स कंपनीत आयकर विभागाने छापा टाकला असून आज सकाळच्या सुमारास चार वाहनांमधून आयकर विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक अचानक कंपनीत येऊन धडकले. जवळपास चार तासांपासून इथे चौकशी सुरु असून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. नाशिकमध्ये आणखी काही कंपन्यांमध्ये आयकर विभागाकडून चौकशी सुरु असल्याची चर्चा असून यामुळे औद्योगिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. काहीच दिवसांपूर्वी 3 हजार कोटीहून अधिक गैरव्यवहार केल्याने नाशिकच्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकरने छापेमारी केली होती आणि आता उद्योजक आयकरच्या रडारवर आले आहेत.
शारदा मोटर्स कंपनीवर छापा
आयकर विभागातील बड्या अधिकाऱ्यांसह विशेष पथकाने आज सकाळी शारदा मोटर्स कंपनीवर छापा टाकला. पथकामध्ये अनेक अधिकारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहरातील इतरही उद्योजक कंपनीवर छापा टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील बांधकाम व्यवसायिकांवरील कारवाई जवळपास पाच दिवस सुरु होती. त्यामुळे आज आयकर विभागाने कारवाईला सुरवात केली असून या संदर्भातील माहिती गुप्त ठेवण्यात आली असून तपशील बाहेर आला नाही. त्यामुळे आता बांधकाम व्यवसायिकांनंतर उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत. आज सकाळी छापा टाकण्यात आला असून नेमकी किती रक्कम हस्तगत करण्यात आली, कारवाईत काय काय सापडले? किती दिवस कारवाई करणार? नाशिक शहरातील कोणते उद्योजक रडारवर आहेत, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.