Nashik News : आता नाशिकच्या डोंगरांना सुखाचे दिवस येतील का? गौण खनिजाचे सर्वाधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे
Nashik News : गौण खनिज (mineral extraction) प्रकरणाची कामे व प्रकारणांबाबतचे सर्वाधिकार नाशिकचे (Nashik) जिल्हाधिकारी गंगाथरण डी (Collector Gangatharan D) यांनी स्वतःकडे घेतले आहेत.
Nashik News : गौण खनिज (mineral extraction) प्रकरणाची कामे व प्रकरणांबाबतचे सर्वाधिकार नाशिक (Nashik) जिल्हाधिकारी गंगाथरण डी (Collector Gangatharan D) यांनी स्वतःकडे घेतले आहेत. तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढल्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे (Dattaprasad Nade) यांच्या अधिकारात कपात झाली असून त्यांच्या कामकाजावरच अप्रत्यक्षरीत्या ठपका ठेवण्यात आल्याचे समजले जात आहे. दरम्यान प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हाधिकारी ऍक्शन मोडवर आले असून याच कारवाईचा हा एक भाग असल्याचे मानले जात आहे.
नाशिकचा (Nashik) महसूल विभाग (Department of Revenue) नेहमीच चर्चेचा विषय असतो. गौण खनिज संदर्भात जिल्ह्यातील कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून दाखल अवैध गौण खनिज, उत्खनन, वाहतूक, साठवणूक याबाबत कनिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या आदेशाविरुद्ध अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अपील दाखल होऊन त्यावर सुनावणी होऊन होते. मात्र या संदर्भातील कामकाजाता जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःच्या अखत्यारीत घेतले आहे. त्यानुसार याबाबतचे कार्यालयीन कामकाज गौण खनिज विभागामार्फत करण्यात येईल तर उपजिल्हाधिकारी प्रशासन विभागाच्या संचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील. तसेच दाखल होणाऱ्या अपीलांचे पुन निरीक्षणाचे कामकाज जिल्हाधिकारी स्वतः बघणार असल्याचे आदेशातच तसे नमूद करण्यात आले आहे. त्यासोबतच गौण खनिज विषय कनिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाविरुद्ध दाखल अपिलांची प्रकरणे तातडीने जाऊन खनिज विभागाकडे वर्ग करण्याच्या सूचनाही अपील शाखेला देण्यात आल्या आहेत.
गौण खनिज संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय हा महसूल विभागात चर्चेचा विषय बनला आहे. हे आदेश म्हणजे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजावरच संशयाचे धुके दाटल्यासारखे आहे. तसेच गौण खणीज विभागाच्या कारभारावर ही संशयाची सुई निर्माण झाली असून विशेष म्हणजे सर्व प्रकाराबद्दल महसूल मधील अन्य कर्मचाऱ्यांनी मात्र चूप्पी साधली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेले गौण खनिज अपीलाचे अधिकार अचानक काढण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भातील अधिकार वर्ग करण्यात आले आहेत.
गौण खनिजांचा सुपर व्हिजनचा विषय असून तो जिल्हाधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी दोघांकडून हाताळला जातो. सध्याच्या कारवायांमुळे अपिलांची संख्या वाढत आहे. अपील कोणाकडे करावे, याबाबत संदिग्धता राहू नये यासाठी हा निर्णय घेतला असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांनी दिली. मंगळवारी सायंकाळी जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. मात्र अचानक करण्यात आलेल्या कारवाई विषयी प्रशासकीय पातळीवर अधिकाऱ्यांनी बाळगले आहे.
गौण खनिज विभाग अनेकदा चर्चेत
जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाचा कारभार अनेकदा चर्चेत आला आहे. आता जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशामुळे पुन्हा या विभागाची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी गेल्या एप्रिलमध्ये निवासी उपजिल्हाधिकाऱ्यां कडूनही अधिकारी काढून घेण्यात आले होते. अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक साठवणूक याबाबत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल अपिलांचे कामकाज हे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चालवण्यात येणार आहे. याबरोबरच या संदर्भातील कामकाज हे गौण खनिज शाखेमार्फत केले जाणार असल्याचे आदेशात नमूद आहे. विशेष म्हणजे खणीकर्म मंत्री दादा भुसे यांच्यात जिल्ह्यात गौण खनिज विभागाच्या कारभाराबाबत अविष्कार दाखवला जात असल्याचे दिसून येत आहे.