Nashik Crime :


नवरा बायकोचा घरगुती भांडणातून नवऱ्याचा मृत्यू (Murder) झाल्याची दुर्दैवी घटना नाशिक (Nashik) शहरातील त्रिमूर्ती चौक परिसरात घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


श्रीरामपूर पालिका बाजार येथील तिबेटीयन मार्केट परिसरात व्यवसाय करणारे कैलास बाबुराव साबळे या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी मध्यरात्री कैलास हा घरी आला असता त्याचा बायकोसोबत वाद झाला. यावेळी पती पत्नीच्या भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले. शेवटी कैलास याच्या डोक्यास मार लागून त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 


दरम्यान रविवारी सकाळी कैलास यांचा मृत्यू झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर त्याच्या हत्येचा बनाव करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आला. पत्नी निशा साबळे व मित्र पिंटू गायकवाड यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर नवरा बायकोच्या भांडणात मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु त्यांना जीवे मारण्याचा कोणताही उद्देश नसल्याचे पुढे आले आहे. दरम्यान हा प्रकार उघडकीस येताच संपूर्ण परिसरात खून झाल्याची चर्चा पसरली होती.


या प्रकरणी अंबड पोलिसांनी घटनास्थळी भेट पाहणी केली होती. त्यानुसार त्यांनी तपासाची चक्रे फिरवत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी संशय आला असता त्यांनी कैलासची पत्नी निशा साबळे सह एकाला ताब्यात घेत चौकशी केली. दरम्यान पतीचे मद्याचे व्यसन सुटून नेहमीच्या भांडणापासून मुक्ती मिळावी आणि कैलासमध्ये सुधारणा हाेण्यासाठी संशयित पत्नीने धडा शिकवण्यासाठी त्याला इतरांच्या मदतीने मारहाण केल्याचे समाेर येत असून तिघांवर त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने अंबड पाेलिसांनी कार्यवाही केली आहे. 


पोलिसांची प्राथमिक माहिती.... 
कैलास साबळे यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. पोलिसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शनिवारी सायंकाळी कैलास हा मद्याच्या नशेत घरी आला. बायकोसोबत बोलल्यानंतर तो पुन्हा घरातून बाहेर पडला. त्याचा मित्र पिंटू गायकवाड याने कैलास याला घरी आणून सोडले. त्यावेळी त्याच्या डोक्यास जखम व हातापायावर मारहाणीचे व्रण दिसत होते. त्याने स्वतःच्या हाताने जखमांवर हळद लावली. या दरम्यान पत्नी निशा हिने त्यास पिण्यासाठी दुधाचा ग्लास दिला. त्यानंतर सकाळच्या सुमारास कैलास लाउठविण्यासाठी पत्नी निशा गेली असता, त्याची काहीच हालचाल होत नसल्याचे प्राथमिक तपासात सांगण्यात आले होते. मात्र पोलिसांनी चक्रे फिरवत घटनेचा तपास केला.