Shravani Somwar : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) येथे तिसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त (Shravani Somwar) प्रचंड गर्दी असून देशभरातून भाविक त्र्यंबकेश्वरात दाखल झाले आहेत. तसेच त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग दर्शनासह लाखो भाविकांनी  ब्रम्हगिरी फेरीसाठी (Bramhgiri Feri) हजेरी लावली आहे. त्यामुळे शहर परिसरात भाविकांसह पर्यटकांची गर्दी गर्दी ओसंडून वाहत आहे. 


मागील दोन वर्ष कोरोना (Corona) काळात गेल्याने श्रावण सोमवार तसेच ब्रम्हगिरी फेरीसाठी भाविकांनी पाठ फिरवली होती. मात्र निर्बंध शिथिल झाल्याने यंदा श्रावण सोमवार सुरु झाल्यापासून त्र्यंबकेश्वर शहरात भाविकांची वर्दळ सुरु होती. त्याच यंदा तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त रविवारच्या सायंकाळपासूनच शहरात येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढली. त्याच नाशिक- त्र्यंबकेश्वर रस्त्यावर प्रचंड ट्रॅफिकही पाहायला मिळाली. जवळपासून दोन लाखाहून अधिक भाविक त्र्यंबकेश्वरात दाखल असून जोतिर्लिंग दर्शनासह ब्रम्हगीरी फेरी करत आहेत. 


दरम्यान तिसऱ्या श्रावण सोमवारानिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. देशभरातून भाविक त्र्यंबकराजांच्या दर्शनासाठी येत आहेत. विशेष म्हणजे ब्रम्हगिरीची प्रदक्षिणा देखील लाखो भाविक करत असतात. त्यामुळे भाविकांना नाशिक ते त्र्यंबकेश्वर जाण्यासाठी परिवहन महामंडळाकडून जादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.


श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारला भाविक लाखोंच्या संख्येने दाखल होतात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर ला श्रावण महिन्यात विशेष महत्व असते. या दिवशी ब्रम्हगिरीची प्रदक्षिणाही केली जाते. त्यामुळे श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भाविकांचा ओघ जास्त असतो. म्हणून लाखो भाविक त्र्यंबक नगरीत दाखल झाले आहेत. भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासन देखील सज्ज आहे. 


लाखोंहून अधिक भाविकांची उपस्थिती
नाशिकहुन त्र्यंबकेश्वरसाठी 300 बसगाड्या धावत आहेत. तसेच भाविकांना खासगी वाहनांचा अडथळा येऊ नये, यासाठी खंबाळे येथे खासगी वाहनाची पार्किंग व्यवस्था आहे. दरम्यान रविवार सायंकाळ पासूनच त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या वाहनाची रीघ लागल्याचे दिसून आले. आज त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग आणि फेरीसाठी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरात दाखल असून दिवसभर प्रचंड गर्दी होती. 


ब्रम्हगिरी फेरीसाठीही प्रचंड गर्दी
तिसऱ्या श्रावणी सोमवारी लाखो शिवभक्त ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालतात. रविवारी रात्री या फेरीला सुरुवात होते. त्यामुळे रविवारी सायंकाळपासूनच शहर परिसरात भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून आले. शिवाय दोन वर्षे बंद असलेल्या फेरीमुळे यंदा गर्दी वाढल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. फेरीमार्गावर वैद्यकीय पथके तैनात असून खंबाळे, तळवाडे येथे पार्किंग व्यवस्था असून खासगी वाहनांना त्र्यंबकमध्ये प्रवेशबंदी आहे.