Nashik News : सध्या शहरात चोरीच्या, घरफोडीच्या घटना उघडकीस येत आहेत. यामुळे नागरिक हैराण असताना रुग्णवाहिका चालकाचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. 


अनेकदा वस्तू ठरवितात, मोबाइलला गहाळ होता, त्यामुळे अनेकांना वाटते कि आता मिळणार नाही. मात्र नाशकातील एका प्रामाणिक चालकाने महिलेची पर्स परत केली आहे.रुग्णवाहिका चालकाच्या या प्रामाणिकपणाचं सर्वत्र कौतुक होत आहे. 


नारायण जेजुरकर अशा या प्रामाणिक चालकाचे नाव आहे. जेजुरकर हे रुग्णवाहिका चालवितात. ते नाशिकच्या आडगाव नाक्यावर थांबत असतात. अशावेळी कुण्या पेशंटचा कॉल आल्यास ते रुग्णवाहिताका पुरवितात. दरम्यान त्यांना आज एका ठिकाणाहून कॉल आला. या ठिकाणी गेले असता अपघात झाला होता.  त्यांनी तातडीने रुग्णांना घेत जिल्हा रुग्णालयात सोडले. 


सदर महिला रुग्णाला पोहचवल्यानंतर ते थांबून गाडी साफ करत असताना त्यांनी हि पर्स सापडली. त्यांनी लागलीच पंचवटी पोलीस स्टेशन गाठत संपूर्ण प्रकार कथन केला. आपण पाहतो कि सोन साखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.  मात्र, सोन्याच्या प्रलोभनाला बळी न पडता प्रामाणिकपणे सोन्याचे मंगळसूत्र, दोन मोबाईल असे हजारो रुपयांचे दागिने परत करून रुग्णवाहिका चालकाने प्रमाणिकपणाचे दर्शन घडविले. 


असा होता मुद्देमाल
छोटे मणी व पँडल असलेली पोत, लांब मण्यांची दुसरी पोत, ६२ रुपये, टन चाव्या, दोन मोबाईल. 


अशा घटनांचा अभाव 
शहर पोलिसांत चोरी, काही वस्तू हरवल्याची अनेक घटना प्राप्त होतात. तक्रार दाखल केल्यानंतर शोध घेतला जातो. परंतू वस्तू मिळत नाही. मात्र काहीवेळा असे प्रामाणिक नागरिक जीवावर उदार होऊन माणुसकीचे दर्शन घडवितात. एकीकडे नाशिक शहरात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. शहरातील महत्वाच्या ठिकाणी खून,  प्राणघातक हल्ले, मारहाण आदी घटना घडत आहेत. यामुळे पोलीस हैराण झाले आहेत. अशातच तर किरकोळ घटना बाजूलाच राहून जात आहे. मात्र कुठून तरी अशा प्रकारचे आशादायी चित्र आल्याने पोलिसांमध्ये देखील समाधान व्यक्त केले जात आहे.