Nashik Post Bank : कुणी दूरवरून लिहलेले पत्र पोस्टमन घेऊन आला की, किती बरं वाटायचं, अलिकडे मनी ऑर्डर पोस्टाद्वारे पाठवण्यास सुरुवात झाली. आता तर त्याहून पुढे जात पत्र पाठवण्याची सेवा डिजिटल झाल्याने अनेक कामात कागद बाजूला पडून संगणकाने ती जागा घेतल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत अनेकदा बँकेचे हफ्ते पोस्टात जाऊन भरले असतील. मात्र आता घरबसल्या हि सुविधा आपल्याला मिळणार आहे. 


पोस्ट म्हटलं कि आपल्याला पहिल्यांदा पोस्टमन आठवतो, मग नंतर कुणीतरी आपल्यासाठी लिहलेलं पत्र. त्यानंतरच्या काळात पोस्टाद्वारे पैसे देखील पाठवले जाऊ लागले. मात्र आताच काळ हा डिजिटलचा असल्याने यात पोस्ट विभागाला मागे राहून कसे चालेल. त्यामुळे पोस्टाचे खाते असो, किंवा पोस्टाद्वारे इतर ऑनलाईन कामे असो ती आता सर्रास होत आहेत. यापुढे जात नाशिकच्या पोस्ट विभागामार्फत ग्राहकांच्या सेवेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲप सेवा सुरू करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून दरमाह हप्ते ऑनलाईन स्वरूपात भरता येणार आहे. 


अनेक नागरिकांचे लोनचे हफ्ते, बँकिंगची कामे आता पोस्टाद्वारे करता येतात. त्यामुळे अनेकदा नागरिक बँकेत न जाता थेट पोस्टात जाण्याचे पसंत करतात. मात्र आता पोस्टात जाण्यासाठीची पायपीट देखील थांबणार आहे.  पोस्ट विभागामार्फत ग्राहकांच्या सेवेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲप सेवा सुरू करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून दरमाह हप्ते ऑनलाईन स्वरूपात भरता येणार आहे. ग्राहकांसाठी 24 तास सेवा उपलब्ध हाेणार असून या सुविधेचा अधिकाधिक पाेस्टाच्या ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाचे प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे.


इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲप सेवेचा लाभ घेण्यासाठी आय.पी.पी.बी खाते असणे गरजेचे आहे. खाते उघडल्यानंतर आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरच्या माध्यमातून इंडिया पोस्ट पेमेंट बँकिंग ॲप डाऊनलोड करावे. त्यातील पोस्ट ऑफिस सर्व्हिस या ऑप्शनमध्ये पोस्ट लाईफ इन्शुरन्स या पर्यायाच्या माध्यमातून ग्राहकांना घरी बसून काही मिनिटांतच भरणा करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून स्टॅण्डींग इन्स्ट्रक्शनद्वारे आपल्या प्रिमियमचा भरणा तसेच ऑटो कटींग देखील करता येणार आहे. याबरोबरच आर.डी, पी.पी.एफ, सुकन्या समृद्धी योजना इत्यादींचाही भरणा या ॲपच्या माध्यमातून करता येणार आहे. याबाबतची अधिक माहिती जवळच्या पाेस्ट कार्यालयातून प्राप्त करावी, असे आवाहन असे प्रवर डाक अधीक्षक अहिरराव यांनी केले आहे.


अशी करा प्रक्रिया 
इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲप सेवेचा लाभ घेण्यासाठी आय.पी.पी.बी खाते असणे गरजेचे आहे. खाते उघडल्यानंतर आपल्या मोबाईलमधील प्ले स्टोअरच्या माध्यमातून इंडिया पोस्ट पेमेंट बँकिंग ॲप डाऊनलोड करावे. त्यातील पोस्ट ऑफिस सर्व्हिस या ऑप्शनमध्ये पोस्ट लाईफ इन्शुरन्स या पर्यायाच्या माध्यमातून ग्राहकांना घरी बसून काही मिनिटांतच भरणा करता येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून स्टॅण्डींग इन्स्ट्रक्शनद्वारे आपल्या प्रिमियमचा भरणा तसेच ऑटो कटींग देखील करता येणार आहे. 


हफ्ता भरा, घरी बसून!
पोस्ट विभागामार्फत ग्राहकांच्या सेवेसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक ॲप सेवा सुरू करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून दरमाह हप्ते ऑनलाईन स्वरूपात भरता येणार आहे. ग्राहकांसाठी 24 तास सेवा उपलब्ध हाेणार असल्याने घरी बसून अँपद्वारे ऑनलाईन हफ्ता भरता येणार आहे.