Nashik Gram panchayat : उराशी गावचा विकास बाळगून त्याने निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली. मात्र निवडणुकीत अनेक वर्षांपासून सत्ता भोगून असलेल्या मातब्बरांपुढे टिकाव लागलं का? असा प्रश्न त्याला कधी पडला नाही. गावकऱ्यांचा आशीर्वाद घेऊन गावच्या भल्यासाठी त्यानं निवडणूक लढवली अन् सर्व दिग्गजांना मात देत तो सरपंचपदी विराजमान झाला. 


राज्यभरात ग्रामपंचायत (Grapanchayat) निकालाचा जल्लोष सुरु आहे. नाशिकच्या (Nashik) चांदवड तालुक्यातील शिंगवे ग्रामपंचायतमध्ये (Grampanchayat Election) देखील गावकऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. कारण एका 26 वर्षीय गावच्या मुलानं गावात इतिहास घडविला असून सर्व गावकऱ्यांच्या साथीने ग्रामपंचायत निवडणूक जिंकली आहे. शिंगवे ग्रामपंचायतीवर भाजपच्या आत्माराम खताळ या 26 वर्षीय तरुणाने 109 मतांची आघाडी घेत विजय मिळवला असून संदीप गुंड, शरद पाटील, जी भाऊ खताळ अशा स्थानिक मातब्बर नेत्यांचा त्याने पराभव केलाय. आत्माराम हा शेतकरी कुटुंबातील असून गावच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया त्याने एबीपी माझाशी बोलतांना व्यक्त करत सर्व गावकऱ्यांचे आभार मानले आहेत. 


नाशिक जिल्ह्यात 188 ग्रामपंचायतींसाठी मतमोजणी पूर्ण झालीय. चांदवड तालुक्यात 34 पैकी 14 ग्रामपंचायतीवर भाजपचे उमेदवार विजयी झाले असून यात विशेष गोष्ट म्हणजे शिंगवे ग्रामपंचायतीवर भाजपच्या आत्माराम खताळ या 26 वर्षीय तरुणाने 109 मतांची आघाडी घेत विजय मिळवला. यात ताईने स्थानिक नेते संदीप गुंड, शरद पाटील, जी भाऊ खताळ अशा स्थानिक मातब्बर नेत्यांचा त्याने पराभव केला आहे. आत्माराम हा शेतकरी कुटुंबातील असून गावच्या विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया त्याने एबीपी माझाशी बोलतांना व्यक्त करत सर्व गावकऱ्यांचे आभार मानले आहेत. शिंगवेच्या सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर आत्माराम खताळ याने 'नवा गडी नवे राज्य' स्थापन केले असून स्थानिक नेत्यांना धूळ चारली आहे.  


चांदवड तालुक्यातील सरपंच 
हिराबाई यशवंत पगार (भाटगाव), अलकाताई पुंडलिक शिंदे (सोनीसांगवी), राहुल जाधव (खेलदरी), रंजनाबाई रामदास पानसरे (पुरी), डॉ. स्वाती भाऊराव देवरे (निमोण) साईनाथ कोल्हे (विटावे), संदीप निवृत्ती जाधव (तळवाडे) कविता सिताराम मोरे (कुंदलगाव) आत्माराम खताळ (शिंगवे) प्रवीण मनोहर आहेर (वाद), ज्ञानेश्वर पांडुरंग शिंदे (देवरगाव), जालिंदर पवार (दरेगाव) लताबाई निवृत्ती घुले (आडगाव), अमोल शंकर जाधव (शेलु), रवीना विष्णू सोनवणे (निंबाळे) पवन साहेबराव जाधव (चिंचोले), गजानन बाळू पगारे (दहेगाव), बाळासाहेब विठ्ठल सोनवणे (गणूर) यादव गरुड (रेडगाव). 


नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतचा निकाल
दरम्यान नाशिक जिल्ह्यात एकूण 196 ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. दरम्यान माघारीनंतर आठ ग्रामपंचायत बिनविरोध निवडून आल्या. त्यानंतर रविवारी 188 ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज सकाळपासून मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येत होता. अखेर सरासरी 196 ग्रामपंचायतींचा निकाल घोषित झाला असून त्यानुसार 63 जागांसह राष्ट्रवादी जिल्ह्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल भाजप 55 जागा घेऊन दुसऱ्या नंबरवर आहे. शिवसेना (ठाकरे गट) 28 जागा, शिवसेना (शिंदे गट) - 22 जागा, काँग्रेस - 7 जागा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 1 जागा, स्वराज्य संघटना - 3 जागा, इतर अपक्ष व पक्ष मिळून 17 जागांवर विजय मिळवला आहे.