Nashik Gram panchayat Result : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या येवला मतदारसंघातील (Yeola Assembly) ग्रामपंचायतींचा धक्कादायक निकाल हाती आला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) मोठा धक्का यांना धक्का बसला असून अनेक वर्षांची सत्ता गमावली आहे. भुजबळांच्या येवला मतदारसंघात ठाकरे गटाचे वर्चस्व प्रस्थापित केले असून सात पैकी फक्त एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय मिळवता आला आहे. 


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सात तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक (Grampanchayat Election) निकाल घोषित होत असून आतापर्यत काही ग्रामपंचायतींचा निकाल (Grampanchayat Election Result) हाती आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात भाजपाची सरशी असून त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे घड्याळ सुसाट आहे. तर त्यांनतर अनुक्रमे शिवसेना (Shivsena), शिंदे गट आणि काँग्रेस असल्याचे चित्र आहे. अद्याप संपूर्ण निकाल येणे बाकी असून जिल्ह्यातील एक एक ग्रामपंचायतीचे निकाल हाती येत आहेत. या सगळ्यात छगन भुजबळ यांना मोठा धक्का बसला असून भुजबळांच्या येवला मतदारसंघात ठाकरे गटाचे वर्चस्व प्रस्थापित केले असून सात पैकी फक्त एका ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा विजय मिळवता आला आहे. 


नाशिक जिल्ह्यातील भुजबळांचा बालेकिल्ला असलेल्या  येवला मतदार संघामध्ये ठाकरे गटाने वर्चस्व स्थापन केलेले आहे. सात पैकी फक्त एका गावामध्ये राष्ट्रवादीचा विजय दिसून आलेला आहे. त्यामुळे छगन भुजबळ यांचा करिष्मा आज त्यांच्याच होम ग्राउंडमध्ये चाललेला दिसत नाहीये. सात ग्रामपंचायतचे निकाल आतापर्यंत जाहीर झाले असून यामध्ये नांदेड सर ग्रामपंचायत भाजपकडे गेलेली आहे. खैरगव्हाण, कुसुर आणि चांदगाव ही ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे गेल्याने येवला मतदारसंघात ठाकरे गटाचे वर्चस्व दिसून येत आहे. तर एरंडगाव हि एकमेव ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे गेली आहेत. तर नांदेड सर ग्रामपंचायत भाजपकडे गेलेली आहे. आतापर्यंत सात ग्रामपंचायतीचे निकाल येवल्यामध्ये लागलेले आहेत. 


आमदार दिलीप बनकर यांना धक्का
नाशिक जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायती धक्कादायक निकाल हाती आला आहे. निफाडचे राष्ट्रवादीचे आमदार आणि अजित पवारांचे निकटवर्तीय दिलीप बनकर यांना धक्का बसला असून पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीवरील दहा वर्षांची सत्ता गमावली आहे. तर या ग्रामपंचायतीवर थेट सरपंच पदी ठाकरे गटाचे भास्कर बनकर विजयी झाले आहेत. ठाकरे गटातील भास्कर बनकर यांना 8 हजार 335 मते पडली तर राष्ट्रवादीचे गणेश बनकर यांना सहा हजार मतांवर समाधान मानावे लागले. तर दुसरीकडे भाजप उमेदवार असलेल्या सतीश मोरे यांना 8 हजार 122 मते पडली. म्हणजेच भाजपच्या उमेदवाराने ठाकरे गटाच्या उमेदवाराला चांगली टशन दिल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.