Nashik Grampanchayat Election : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) आणि इगतपुरी (Igatpuri) या चार तालुक्यांमधील 187 ग्रामपंचायतींसाठी (Grampanchayat Election) उद्या रविवारी मतदान (Voting) होत आहे. यापूर्वी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून महिनाभरापासून सुरू असलेला प्रचार शुक्रवारी सायंकाळी थांबवण्यात आला. संबंधित तालुक्यांमधील 607 केंद्रांवर रविवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरु होईल. सरपंचाची निवड थेट मतदान करणार असल्याने या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे.


नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील एकूण 194 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यापैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. त्यामुळे आता 187 ग्रामपंचायतींसाठी मतदान घेण्यात येणार असून इच्छुक उमेदवार महिनाभरापासून तयारी लागले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर परिसराचा वेग वाढत गेला शुक्रवारी प्रचाराचा अंतिम दिवस असल्याने उमेदवारां दिवस समर्थकांनी मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला. ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी. यासाठी जिल्हा प्रशासनाने देखील तयारी पूर्ण केली आह.  शनिवारी संबंधित कर्मचारी मतदान केंद्रांवर जाणार असून त्यापूर्वी त्यांना पुन्हा एकदा प्रशिक्षण दिले जाणार आहे. या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर होणार आहे. 


दरम्यान चार तालुक्यांतील 187 ग्रामपंचायतींसाठी तालुका निहाय ग्रामपंचायत व मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. यानुसार पेठ तालुक्यात एकूण 69 ग्रामपंचायत साठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात असून यासाठी 211 मतदान केंद्रांवर उद्या मतदान प्रक्रिया पार पडेल. तर सुरगाणा तालुक्यातील 59 ग्रामपंचायती असून 208 मतदान केंद्र असतील. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील 54 ग्रामपंचायतींसाठी 103 मतदान केंद्र आहेत. तर इगतपुरीतील पाच ग्रामपंचायतींसाठी 15 मतदान केंद्र सज्ज झाली आहेत. 


सात ग्रामपंचायती बिनविरोध
दरम्यान महिनाभरापासून जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये 194 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे यातील सात ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या असून यामध्ये त्रंबकेश्वर तालुक्यातील जातेगाव खुर्द, पिंपळद त्र्यंबक आणि सारस्ते तर पेठ तालुक्यातील नाचलोंडी आणि अंदुरट व सुरगाणा तालुक्यातील मोहपाडा व अलंगुन या ग्रामपंचायती बिनविरोध निवड निवडणूक झाली आहे. त्यामुळे उरलेल्या 187 ग्रामपंचायतीसाठी उद्या रविवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी मतदान केंद्रे सज्ज झाली असून दोन दिवसांत ग्रामपंचायतींना नवा कारभारी मिळणार आहे. 


डिजिटल प्रचाराचा धुरळा थंडावला!
यंदा प्रथमच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी तरुणांचा जोर पाहायला मिळत आहे. शिवाय नाशिक जिल्ह्यातील चार तालुक्यातील १८७ ग्रामपंचायतीसाठी उद्या रविवार मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. तत्पूर्वी या निवडणुकांत जोरदार प्रचार पाहायला मिळाला. शिवाय यंदाच्या निवडणुकात उमेदवारांनी डिजिटल प्रचाराचा धुरळा पाहायला मिळाला. व्हाट्सअँप स्टेटस, फेसबुक आदींवर उमेदवारांचे पोस्टर झळकत होते. सोशल मीडियावर डिजिटल प्रचाराचा धुरळा पहायला मिळाला. सध्या प्रचार थंडावला असून आता उद्या मतदान होईल, त्यानंतर सोमवारी मतमोजणी होणार आहे.