Sanjay Raut : कर्नाटकाच्या (Karnatka) मुख्यमंत्र्यांनी काही गावांसाठी सोलापुरात (Solapur) हक्क सांगण्यास सुरवात केली. म्हणून तुम्ही सोलापुरात कर्नाटक भवन (Karnataka Bhawan) उभं करायचं म्हणत आहेत. मात्र सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या, असा उलट सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना केला आहे. 


शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून आज सकाळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई (CM Bommai) यांच्या आगपाखड केली. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्राचे प्रत्येक राज्याशी प्रेमाचे संबंध असून कर्नाटकाशी सुद्धा आहेत. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री काल परवा नवस फेडायला गेले होते. गुवाहाटीवरून येताना आसाममध्ये आसाम भवन उभ करण्याच ठरवलं. तर दुसरीकडे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सोलापूर, कोल्हापूरमध्ये कर्नाटक भवन उभं करणार असल्याचे सांगितले. मुंबईमध्ये सुद्धा अनेक भवन आहेत. कानडी बांधवांचे अनेक हॉल्स, भवन आहेत. पण जर तुम्ही सीमा वादाच्या लढ्यात काही गावांवरती हक्क सांगताय म्हणून सोलापुरात किंवा कोल्हापुरात त्यासाठी कर्नाटक भवन बांधणार असाल तर आम्हाला सुद्धा बेळगावात महाराष्ट्र भवन बांधण्यासाठी जागा द्या. बेळगाव आणि बेंगलोरला महाराष्ट्र भवन बांधण्याची आमची इच्छा असून या ठिकाणी दोन भवन बांधण्यात येईल, त्या संदर्भात निर्णय व्हावा, मग आम्ही तुमचा विचार करू असे संजय राऊत कर्नाटक मुख्यमंत्री बोम्मई यांना सुनावले. 


त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या आपणावर शिंदे गटातील आमदार मूग गिळून आहेत. त्यावर संजय राऊत म्हणाले, मला जर कोणी गद्दार शिव्या देत असतील तर तो माझा मी सन्मान समजतो. खर म्हणजे त्यांना जर उत्तम शिव्या देता येत असतील तर त्यांनी सगळ्यात आधी छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल, प्रवक्ते, मंत्री यांना द्याव्यात. आम्ही त्या शिव्या देणाऱ्यांवरती फुले उधळू, आम्ही त्यांना संधी देतोय, छत्रपती शिवरायांचा अपमान तुम्ही सहन करताय, सावित्रीबाई फुले यांचा अपमान सहन करताय, द्या ना त्यांना शिव्या, तुम्हाला जर इतक्या उत्तम शिव्या देता येत असतील, त्यांना शिव्या द्या, महाराष्ट्र तुमच्या शिव्यांच कौतुक करेल अशा भाषेत संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांना सुनावले. 


गेल्या काही दिवसांपासून शिवरायांचा अपमान करण्याची महाराष्ट्रात लाट आली आहे. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे, भाजपकडून सर्रास शिवरायांचा अपमान करण्याचे सत्र सुरु आहे. भाजप हे शिवप्रेमाचे ढोंग करत आहे. मोदी यांना रावण म्हटल्यावर तुमची अस्मिता जागी होत आहे. मग महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान केल्यावर तुमची अस्मिता थंड का पडते, तिथे तुमचा नाग फणा काढत नाही. काही चुकीचं असेल तर मला सांगा? असा उलटप्रश्न देखील राऊतांनी केला. 


विरोधकांना अडचणीत आणण्याचे काम 
संजय राऊत यांनी यावेळी भाजप, कर्नाटकचे मुख्यमंत्री यांच्यासह शिंदे गटाचे आमदार आणि भाजप नेते यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. ते यावेळी म्हणाले. मागील काही महिन्यात ज्या पद्धतीने तपास यंत्रणांची विरोधी पक्षाच्या नेत्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरु आहे. यावर महाराष्ट्रामध्ये चर्चा व्हायला पाहिजे.  विरोधी पक्षाला अडचण आणण्यासाठी सत्ताधारी एकही वेळ सोडत नाही. केंद्रीय तपास यंत्रणा, महाराष्ट्रातील यंत्रणा कामाला लावून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाकडून केला जात आहे. उदयनराजे यांनी छत्रपती शिवरायांच्या अपमान केल्यानंतर जी भूमिका घेतली, त्याच्याशी मी सहमत आहे. छत्रपती शिवरायांच्या अपमानंतर त्यांनी जी काही जनजागृती केली आहे. त्यांच्यासोबत आहे. आफताब श्रद्धा वालकर प्रकरण अत्यंत निघृण आहे, लव्ह जिहादचा विषयावर एकत्र बसून चर्चा व्हायला हवी, अनेक मुलींच्या हत्या या हिंदू मुलांकडून झाले आहेत, धमकीचे प्रकरणे आहेत. यामध्ये जात धर्म ना आणता या देशातल्या प्रत्येक कन्येचे रक्षण व्हायला हवे ही भूमिका असल्याचे राऊत म्हणाले.