Nashik Tila Ganpati : साधारण 1767 साली नाशिकच्या (Nashik) भडके घराण्यातील पूर्वजांना घराचा पाया खोदताना डाव्या सोंडेची गणेश मूर्ती मिळाली, तेव्हा त्यांनी जवळच मंदिर बांधून मूर्तीची स्थापना केली. त्यावेळी मंदिरासाठी पाच हजार रुपये इतका खर्च करून आजोबा दगडूशेठ भडके यांनी मंदिराची उभारणी केल्याचे भडके कुटुंबीय सांगतात.


नाशिक (Nashik) मंदिराचे शहर म्हणून सर्वदूर लौकिक आहे. केवळ शहरातच नव्हे तर जिल्ह्यात अनेक सुप्रसिद्ध असे मंदिरे आहे. काही प्राचीन मंदीरे प्रसिद्धीच्या फार झोतात नसली तरी त्यांचे प्राचीनत्व त्या मंदिरांची श्रीमंती वाढवते. नाशिकच्या प्रसिद्ध पंचवटी परिसरात असणाऱ्या गणेशवाडीत एका टेकडीवर तिळा गणपतीचे मंदिर आहे. या गणपतीच्या नावावरूनच येथील वस्तीला गणेशवाडी म्हणून ओळखले जाते. दामोदर दगडूशेठ भडके यांना घराचा पाया खोदताना डाव्या सोंडेची गणेश मूर्ती मिळाली. तेव्हा त्यांनी जवळच मंदिर बांधून मूर्तीची स्थापना केली. इसवी सन 1767 साली मंदिरासाठी पाच हजार रुपये इतका खर्च झाला असे सांगतात. पेशवाई काळातील स्थापत्य शैलीत प्रस्तुत मंदिराची रचना आहे. उंच टेकडीवर दगडी पाया आणि वर विटांचे बांधकाम केले आहे. सभामंडप त्यापुढे गर्भगृह असून दोन्ही वरील छत घुमटाकार आहे. गर्भगृहाला समोरासमोर दोन खिडक्या आहेत. सभामंडप आणि गर्भगृहाच्या दाराची उंची अतिशय कमी असल्यामुळे खाली वाकूनच आत प्रवेश करावा लागतो.


भडके घराण्यातील पूर्वजांना ज्यावेळी गणपतीची मूर्ती मिळाली तेव्हा ती अतिशय लहान होती, शेंदूर विलेपनामुळे आता तिचा आकार वाढला आहे. हे आकार वाढण्याचे प्रमाण तिळाइतके आहे, म्हणून याला तिळा गणपती असे म्हणतात. पंचवटीतील प्रसिद्ध काळाराम मंदिराच्या आधीपासून हे तिळा गणपती हे देवस्थान जागृत असल्याने तो नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा मंदिर असल्याची माहिती विनोद भडके यांनी दिली. दरवर्षी पौष महिन्यात मकरसंक्रांतीनंतर येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला येथे मोठी यात्रा भरते. दर्शनाला येणारे भाविक या गणपतीला प्रसाद म्हणून तिळाचे लाडू व तीळ-गूळ वाहतात. मागील चार ते पाच वर्षापूर्वी त्यांनी मंदिराच्या मूळ रूपाला बाधा येऊ न देता जीर्णोद्धार केला. तिळा गणपतीचे मंदिर हे नाशिकच्या भूषणांपैकी एक असून ही मूर्ती प्रसन्न मुद्रेत अबाधित आहे. भडके परिवाराची आता ही नववी पिढी सुरू असून सध्या दामोदर भडके यांचा मुलगा विनोद भडके हे पुजाविधीसह तिळा गणपती मंदिराची देखभाल करतात.


अशी आहे तिळा गणपतीची आख्यायिका 
दामोदर दगडूशेठ भडके यांना घराचा पाया खोदताना डाव्या सोंडेची गणेश मूर्ती मिळाली. तेव्हा त्यांनी जवळच मंदिर बांधून मूर्तीची स्थापना केली. इसवी सन 1767 साली मंदिरासाठी पाच हजार रुपये इतका खर्च झाला असे सांगतात. उत्तर पेशवाई काळातील स्थापत्य शैलीत प्रस्तुत मंदिराची रचना आहे. उंच टेकडीवर दगडी पाया आणि वर विटांचे बांधकाम केले आहे.