Nashik News : सर्वसामान्य नाशिककरांच्या (Nashik) रोजच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेली सिटीलिंक (Citylink Bus service) आपल्या प्रवाशांच्या सुखकर, आरामदायी, सुरक्षित प्रवासासाठी नेहमीच प्रवासाभिमुख निर्णय घेत असते. त्याच अनुषंगाने आता सिटीलिंकने दिव्यांग प्रवाश्यांसाठी नवीन निर्णय घेतला आहे. यामध्ये 40 टक्के किंवा 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या प्रवाश्यांसाठी सिटीलिंक आता मोफत प्रवास उपलब्ध करून देणार आहे. 


नाशिक (Nashik NMC) महापालिकेच्या सिटीलिंक बससेवेच्या माध्यमातून 1 नोव्हेंबरपासून दिव्यांग व्यक्तींना (Disabled) मोफत प्रवास (Free Travle) देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या प्रवाशांसाठी मोफत पास योजना लागू राहणार आहे. 40 किंवा त्यापेक्षा अधिक टक्केवारीच्या दिव्यांगांना सिटीलिंकच्या अधिकृत पास केंद्रावरून सिटीलिंकचा मोफत प्रवासाचा पास काढावा लागेल.


दरम्यान यासाठी 40 टक्के किंवा 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग जास्त दिव्यांग असल्यास तरच साथीदारास सवलतीच्या दरात प्रवास करता येईल. परंतु तरी देखील वाहकाकडून सवलतीचे तिकीट साथीदारास घ्यावे लागेल. तरी ज्या दिव्यांग प्रवाश्यांना मोफत प्रवासाचा लाभ घ्यावयाचा असेन. त्यांनी आवश्यक कागदपत्रांसाहित 14 ऑक्टोबर पासून सिटीलिंक पास केंद्रावरून पास असलेल्या प्रवाश्यांना सिटीलिंकच्या अधिकृत पास केंद्रावरून सिटीलिंकचा मोफत प्रवासाचा पास काढावा लागणार आहे. पास काढण्यासाठी प्रवाशाचा फोटो, रहिवासी पुरावा, आधारकार्ड तसेच 40 टक्के दिव्यांग असल्याचे शासकीय प्रमाणपत्र यांची मुळप्रत तसेच झेरॉक्स कॉपी आवश्यक असेल. तसेच पाससाठी 40 इतके नाममात्र शुल्क आकारले जातील. सदर पास हे केवळ नाशिक महानगरपालिका हद्दीत राहत असलेल्या दिव्यांग प्रवाश्यांनाच काढता येणार आहे. नाशिक शहराबाहेरील कोणत्याही दिव्यांग व्यक्तींना या मोफत प्रवासाचा लाभ घेता येणार नाही.


तसेच 14 ऑक्टोबर पासून सिटीलिंक पास केंद्रावरून सदर मोफत पास काढता येणार असून 1 नोव्हेंबर पासून सदर पासचा वापर करता येणार आहे. सदर पास 01 नोव्हेंबर 2022 पासून ते 31 मार्च 2023 पर्यंतचा असेन व 01 एप्रिल 2023 पासून पुढील वर्षासाठी पुन्हा नवीन पास काढावा लागणार आहे. प्रवास करतेवेळी प्रत्येकवेळी सदर मोफत पास वाहकाकडून स्कॅन करणे बंधनकारक असेन. तसेच सोबत शासनमान्य ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक असेल.  65 टक्के किंवा 65 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्यास व मोफत प्रवासाचा पास असल्यास सोबत असलेल्या प्रवाशाला देखील तिकीटामध्ये ५० टक्के सवलत दिली जाईन. परंतु त्यासाठी पास काढतेवेळी सिटीलिंक सिस्टिम मध्ये ६५ टक्के पेक्षा जास्त जास्त दिव्यांग असल्यास तरच साथीदारास सवलतीच्या दरात प्रवास करता येईल परंतु तरी देखील वाहकाकडून सवलतीचे तिकीट साथीदारास घ्यावे लागेल. 


सिटी लिंककडून आवाहन 
तरी ज्या दिव्यांग प्रवाश्यांना मोफत प्रवासाचा लाभ घ्यावयाचा असेन. त्यांनी आवश्यक कागदपत्रांसाहित १४ ऑक्टोबर पासून सिटीलिंक पास केंद्रावरून पास  पास असलेल्या दिव्यांग प्रवाश्यांनाच विनाटिकीट प्रवास करू दिला जाईल. तसेच १ नोव्हेंबर २०२२ पासून वाहकाच्या मशीनमधूनच दिव्यांग साठीची सवलतीची तिकिटे निघणार नाही. याची प्रवाश्यांनी नोंद घ्यावी. दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र रहिवासी पुरावा व आधार कार्ड या कागदपत्रांची आवश्यकता लागेल. महापालिका हद्दीतील दिव्यांग प्रवाशांनाच काढता येणार आहे. १४ ऑक्टोबरपासून सिटीलिंक पास केंद्रावरून सदर मोफत पास काढता येणार. १ नोव्हेंबरपासून ते ३१ मार्चपर्यंत पास राहील. एप्रिलपासून पुढील वर्षासाठी पुन्हा नवीन पास काढावा लागेल.