Nashik Accident : नाशिक-दिंडोरी-पेठ मार्गावर (Nashik Dindori Road) अपघात नित्याचे झाले असून वेगात आणि ओव्हरटेक करण्याच्या नादात अनेकदा अपघाताच्या घटना समोर आलेल्या आहेत. शिवाय अवजड वाहनांची गर्दी रस्त्यावर असल्याने रोजच अपघात होत आहेत. अशातच पेठरोडवरील (Peth Road) नाशिक महानगरपालिकेच्या कमानीजवळ भीषण अपघातात मिक्सर ट्रकचा चालकाचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरातील (Nashik) पेठरोडवरील नाशिक महापालिकेच्या कमानीजवळ मिक्सर ट्रक आणि एसटी महामंडळाच्या लालपरी बसची (Bus Accident) समोरासमोर धडक झाली. या अपघातात मिक्सर ट्रकचा चालक दिंडोरी तालुक्यातील (Dindori) आशेवाडी येथील बाळू एकनाथ बेंडकुळे याचा मृत्यू झाला असून बस चालक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही वाहनाची धडकेत आठ ते दहा प्रवासी किरकोळ आणि मध्यम स्वरुपात जखमी झाले आहेत. पेठ व जुना आडगाव नाका येथील रुग्णवाहिकेने तात्काळ घटनास्थळ गाठत जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच बसमधील प्रवासी दुसऱ्या बसने नाशिककडे पोहोचवण्यात आले. काही जखमींना बसमधूनही शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ आगारातून (Peth) सुटलेली पेठ-नाशिक-पुणे-नाशिक बस गुरुवारी पेठहून नाशिक व्हाया पुण्याला चालली होती. साडे चार ते पाऊणे पाच वाजेच्या दरम्यान पेठरोडहून मार्गक्रमण करत असताना नाशिककडून आशेवाडीकडे जाणारा आरएमसी मिक्सर ट्रक यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आशेवाडी येथील ट्रक चालक बाळू बेंडकुळे यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच बस चालक गंभीर जखमी झाले, तर जवळपास आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेचा माध्यमातून नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सद्यस्थितीत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु
दरम्यान अपघात झाल्याचे समजताच पेठ-जुना आडगाव नाका येथील रुग्णवाहिकेने जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तसेच अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले. तसेच बसमधील प्रवासी दुसऱ्या बसने नाशिककडे पोहोचले. काही जखमींना बसमधूनही शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येऊन उपचार करण्यात आले. हा अपघात झाल्यानंतर पेठ महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. त्यानंतर प्रशासन आणि नागरिकांनी मदतकार्य राबवत वाहतूक सुरळीत केली.
पेठ मार्गावर अपघात नित्याचे....
नाशिक शहरातून अनेक तालुक्यांना विविध मार्गावरुन जाता येते. तसाच नाशिक ते पेठ हा मार्ग अत्यंत खडतर आणि चालकांची कसरत पाहणारा आहे. त्यामुळे नाशिक ते दिंडोरी आणि नाशिक ते पेठ मार्गावर दर आठवड्याला अपघातात निष्पापांचा मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. हा मार्ग दिंडोरीसह सुरगाणा, नानाशी पेठ या महत्वाच्या भागांना जोडला जातो. पुढे पेठमार्गे गुजरातला जात येत असल्याने अनेक अवजड वाहने याच मार्गाचा अवलंब करतात. परिणामी अपघातांना सामोरे जावे लागते.
हेही वाचा