Nashik Crime : नाशिकमधून (Nashik) एक धक्कादायक माहिती समोर असून राज्यातील विविध पोलिसांकडून आंतरजिल्हा बदलीसाठी (Transfer) बोगस प्रमाणपत्रे (Bogus Certificate) दाखल करण्यात आल्याचे रॅकेट उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये नाशिक जिल्हा रुग्णालयातील (Nashik civil Hospital) वरिष्ठ डॉक्टरांसह 30 वर्षांपासून कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे समोर आले आहे.
राज्यात सर्वोत्कृष्ट रुग्णालयाचा मान मिळवणाऱ्या नाशिकचे जिल्हा रुग्णालय नेहमी चर्चेत असते. अनेकदा रुग्णालयातील असुविधा, कर्मचाऱ्यांची अरेरावी यामुळे सातत्याने चर्चेत राहणारे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात बोगस वैद्यकीय प्रमाणपत्राच्या रॅकेटमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी कांतीलाल रामभाऊ गांगुर्डे याने रॅकेटला खतपाणी घालत नाशिक ग्रामीण पोलिसांना बोगस प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे पोलीस दलाचा वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आंतर जिल्हा बदलीसाठी राज्यभरातील 22 पोलीस अंमलदारांनी 18 मे 2022 पूर्वी हे अर्ज सादर करण्यात आले होते. त्या अर्जासोबत त्यांनी नातेवाईकांचे गंभीर आजार असल्याचे नाशिक व धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे बनावट प्रमाणपत्र सादर केले होते. या अर्जासह कागदपत्रांची पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक हिरा कनोज यांनी व्यवस्थित तपासणी न करता बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यास मदत केली. त्यासाठी नाशिक व धुळे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा अर्जदार पोलिस अंमलदाराचे नातेवाईकांचे गंभीर आजाराचे बनावट प्रमाणपत्र तयार करण्यास मदत केली. त्यातून वैद्यकीय अधिकारी कर्मचारी व लिपिकाने अर्जदार पोलिस अंमलदारांना आंतरजिल्हा बदलीसाठी मदत केली. याप्रकरणी अतिरिक्त उपविभागीय पोलिस अधिकारी खंगेंद्र टेंभेकर यांनी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या रॅकेटची उकल झाली.
शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी असलेल्या अटींपैकी एक शस्त्रक्रियेची अट आहे. त्यानुसार काही अर्जदारांनी बनावट अहवाल सादर केले. ही बाब लक्षात आल्यांनंतर रुग्णालय प्रशासनातर्फे तपासणी केल्यानंतर हे रॅकेट उघडकीस आले. त्यातील घोळ उघड झाला असून संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. आतरंजिल्हा बदलीसाठी आणखी कोणी बोगस प्रमाणपत्र दिले आहेत का? याचा शोध घेतला जात असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
यांचा रॅकेटमध्ये समावेश
दरम्यान बोगस प्रमानपत्रांच्या रॅकेटमध्ये पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिक हिरा कनोज यांचा सहभाग आढळल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. या रॅकेटमध्ये नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक हिरा रवींद्र कनोज नाशिक, धुळे जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, रुग्णालयातील लिफ्टमॅनसह कनिष्ठ लिपिक किशोर पगारे, त्याचबरोबर शहरातील दोन हॉस्पिटल्सच्या डॉक्टरांचा समावेश असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.