Nashik Unknown Drone : नाशिकमध्ये (Nashik) लष्करी हद्दीत एक महिन्यात दोनवेळा ड्रोन (Drone) उडाल्याच्या घटनेने खळबळ उडाली असून संरक्षण विभागासह गृह विभागाकडून याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सरंक्षण विभाग, पोलिस, इंटेलिजन्स टिम आणि अँटी टेररिझम ब्रँच कडून तपास सुरू करण्यात आल्याचे समजते आहे.


नाशिक शहरात लष्करी हद्दीत (Army aviation) ड्रोनने रेकी करण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. आडगाव पोलीस ठाण्याच्या (Adgaon Police Station) हद्दीतील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) परिसरात ड्रोन उडवण्यात आला आहे. नाशिकच्या लष्करी हद्दीत हा प्रकार दुसऱ्यांदा घडला असून यामुळे आता खळबळ उडाली आहे.


दरम्यान काही दिवसांपूर्वी गांधीनगर परिसरातील आर्टीलरी सेंटर (Artilary Center) परिसरात ड्रोन उडवल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता आडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील डीआरडीओ संस्थेच्या परिसरात ड्रोन उडविल्याने खळबळ उडाली आहे. येथील डीआरडिओ च्या स्थानिक पोलीस हवालदाराने दिलेल्या तक्रारीनंतर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी याची गंभीर दखल तपास सुरू केला आहे.


दरम्यान संरक्षण विभागासह गृह विभागाकडून याप्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सरंक्षण विभाग, पोलिस, इंटेलिजन्स टिम आणि अँटी टेररिझम ब्रँच कडून तपास सुरू करण्यात आल्याचे समजते आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी नाशिक पोलिस आयुक्त जयंत नाईनवरेंनी याबाबत विशेष बैठक बोलावली असून लष्करी अधिकारीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 


आडगाव पोलीस ठाण्याच्या आधीतील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या परिसरात आज्ञात ड्रोन उडाला आहे. शुक्रवारी सायंकाळी सात वाजता स्थानिक नागरिकांनी हा ड्रोन बघितला असण्याची माहिती डीआरडीओच्या अधिकाऱ्यांना दिली आहे. त्यानंतर डीआरडीओतील एका हवालदाराने दिलेली तक्रारीनंतर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून विमान अधिनियम 1934 चे कलम 11 नुसार कोणतीही परवानगी न घेता ड्रोन उडवल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


महिन्यात दुसऱ्या घटनेने खळबळ
नाशिकमध्ये लष्करी हद्दीत परवानगी नसताना ड्रोन उडवण्याची ही दुसरी घटना असून अशा प्रकारची घटना 25 ऑगस्ट ला रात्री दहा वाजता परिसरात ड्रोन उडाला होता अजून यातील आरोपींचा शोध लागलेला नसतानाच ही दुसरी घटना समोर येत आहे.  त्यामुळे नाशकातील लष्करी ठिकाणांवर रेखी करण्याचा संशय बळावत चालला आहे. या दोन्ही घटनांमध्ये सारखाच प्रकार घडला असून नाशकातील लष्करी ठिकाणांवर रेकी होत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.