Nashik Police : नाशिक (Nashik) शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर सर्रासपणे बेदरकारपणे रॅश ड्रायव्हिंग (Rash Driving) करणाऱ्या धूम स्टाईल दुचाकी चालविणाऱ्या शहर पोलिसांनी (Nashik Police) दणका दिला आहे. दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करून कानठळ्या बसवणारा आवाज करत सुसाट धावणाऱ्या 26 दुचाकीचालकांवर (Dhoom Bike) कारवाई करण्यात आले असून या दिवसाची जप्त करण्यात आले आहेत.  


नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा करणाऱ्या दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला दिले. सर्व पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पदके तयार करून शहरातील वेगवेगळ्या चौकात तैनात करत नाकाबंदी करण्यात आली. त्र्यंबक रोड सीबीएस, अशोक स्तंभ रोड, शरणपूर रोड, सीबीएस, अशोकस्तंभ, शरणपूर रोड, पंडित कॉलनी, कॉलेज रोड, येवलेकर मळा, गंगापूर रोड आदी भागांत कारवाई करण्यात करण्यात आली. या परिसरात धूम स्टाईल स्पोर्ट्स बाईकवरून सुसाट फेऱ्या मारणाऱ्यांची संख्या वाढली होती. दरम्यान काल दिवसभरात 36 दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली. एकुण 22 वाहने आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेली आहेत. वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांकडुन 82 हजार रूपये दंड आकारण्यात आला आहे. 


दरम्यान सायलेन्सरच्या आवाजात तांत्रिक बदल करत आवाजाचे फटाके फोडणे, बाईकस्वार बेफामपणे वाहने चालत असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती. त्यामुळे शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला कठोर नाकाबंदीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बेदरकारपणे वाहन चालवण्याविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना थेट न्यायालयाशी वाट दाखवण्यात आली. तसेच दंडात्मक कारवाई करण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागालाही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यापुढेही शहराच्या हद्दीत अशा प्रकारची कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत शिंदे यांनी दिले आहे. नाशिक शहरातील वाहतूकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस यंत्रणेंनी कंबर कसली असून शहरातील रस्त्यांवर दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे. यामध्ये दुचाकीस्वारांचा बळी जात आहे. तसेच पादचाऱ्यांचाही अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे.



आतापर्यंत 31 लाखांहून अधिक दंड 
सदर नाकाबंदी दरम्यान मोटार सायकलच्या सायलेन्सरमध्ये बदल करून वेगवेगळया कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावण्यात आलेल्या वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली. तसेच सार्वजनिक रस्त्यावर भरधाव वेगाने वाहन चालविणा-या (रॅश ड्रायव्हिंग) इसमांवर कायदेशीर कारवाई करून प्रकरणे न्यायालयात पाठविण्यात आली आहेत. अशा प्रकारे 26 दुचाकी धारकांवर कारवाई करण्यात आली असुन एकुण 26 वाहने आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेली आहेत. तसेच सदर वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणेसाठी प्रादेशिक परिवहन विभाग, नाशिक यांना कळविण्यात आले आहे. यासोबत 01 डिसेंबर पासुन शहर वाहतुक विभागातर्फे विशेष मोहिम राबविण्यात आली असुन आजपर्यंत 6 हजार 308 दुचाकीधारांविरोधात हेल्मेट परिधान न केल्याबदल दंडात्मक कारवाई करण्यात आली असुन कारवाई दरम्यान 31 लाख 72 हजार 500 रूपये दंड आकारण्यात आला आहे.