Nashik Datta Jayanti : आज राज्यभरात दत्त जयंती (Datta Jayanti) साजरी करण्यात येत असून नाशिकच्या (Nashik) शहरातील विविध ठिकाणच्या दत्त मंदिरांना भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. नाशिकमध्ये वर्षानुवर्षे जुनी मंदिरे मंदिरे असून या मंदिरांना आज चैतन्याचे वातावरण पाहायला मिळाले. 


नाशिक शहराला मंदिराची भूमी म्हणून ओळखले जाते. अनेक पुरातन मंदिरे, विविधांगी मंदिरे (Temple) पाहायला मिळतात. आज सर्वत्र दत्तजयंतीचा उत्साह असून नाशिक शहरात देखील अनेक पुरातन दत्तमंदिरे असून त्यांचा इतिहासही अनोखा असून शहरातील सिडको, नाशिकरोड, सातपूर, इंदिरानगर, देवळाली गाव आदी परिसरात पुरातन दत्तमंदिरे असून आज हजारो भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. 


सिडकोचे दत्त मंदिर
नाशिक शहरातील सिडको येथील दत्त मंदिर येथे दरवर्षी दत्त जयंती निमित्त जयंती उत्सव सोळा साजरा केला जातो. तसेच या निमित्त विद्य धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात येते. या दत्त मंदिराची स्थापना दहा डिसेंबर 1981 साली झाली. त्यावेळेस अगदी छोटे मंदिर होते परंतु परिसरातले नागरिक यांची श्रद्धा व उत्साह यामुळे आज बरेच मोठे मंदिर आहे. गेल्या 40 वर्षांपासून दत्त मंदिर आत अनेक प्रकारचे सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम घेतले जातात. 


देवळाली गावातील दत्त देवस्थान
नाशिकरोड उपनगरातील देवळाली गाव येथील श्री दत्त मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून मंदिरात दररोज सकाळ संध्याकाळ पूजाविधी केले जातात. देवळाली गावातील औदुंबराच्या झाडाखाली हे छोटेसे मंदिर दत्त मंदिर असून पंधरा-सोळा वर्षांपूर्वी श्री अवधूत चिंतन समिती व परिसरातील रहिवासी यांनी मंदिराचा जीवनात करून मोठे मंदिर बांधले. दत्त जयंतीला या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते


जुने नाशिकरोडचे दत्त मंदिर
नाशिकरोड परिसरातील दत्त मंदिररोड येथील महादेव सदाशिव वैसास कुटुंबीयांनी 82 वर्षांपूर्वी म्हणजेच 1940 साली श्री दत्त मंदिराची स्थापना केली. या मंदिरातही सकाळ संध्याकाळ आरतीसह पूजा केली जाते. तसेच दरवर्षी गजानन महाराज स्वामी समर्थ श्री शंकर माझा महाराजांची पालखी येत असते दरवर्षी या ठिकाणी दत्तजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या मंदिरावरूनच हा सगळा परिसर दत्त मंदिराच्या नावाने ओळखला जातो. 


इंदिरानगरचे श्रद्धास्थान श्री गुरुदेव दत्त
नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरात जिल्हा परिषद कॉलनीतील श्री गुरुदेव दत्त मंदिर सेवा संस्थांच्या वतीने दत्त जयंती उत्सव साजरा केले जाते. या ठिकाणची मूर्ती संघ संगमरवरची असून जयपुर येथून आणले आहे. दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र प्रवचन, दत्त पूजन, पाळणा आरती, रंग अवधूत भजनी मंडळाचे भजन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 


सातपूरचे चाळीस वर्षे जुने गुरुदेव दत्त मंदिर
नाशिक शहरातील गजबजलेला परिसरातील सातपूर पंचक्रोशीत सर्वात जुने असलेले एकमेव असे अशोक नगरातील गुरुदेव दत्त मंदिर आहे. साधारण 1979 साली या ठिकाणी एक लहानसे देऊळ बांधून गुरुदत्त यांच्या मूर्तीची स्थापना केली होती. या मंदिराचा जिर्णोद्धार 1 डिसेंबर 2011 रोजी करण्यात येऊन भव्य असे मंदिर उभारण्यात आले. दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी दत्त जयंती निमित्त पालखी मिरवणूक दत्त जन्मोत्सव सोहळा महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. 


नाशिकचे एकमुखी दत्त मंदिर 
प्रति गाणगापुर म्हणून ओळख असलेले नाशिकचे श्री एकमुखी दत्त मंदिर ओळखले जाते आहे. असंख्य नाशिककरांचे एकमुखी दत्तमंदिर हे श्रध्दास्थान आहे. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. गोदावरीच्या किनारी हे मंदिर वसलेलं आहे. सध्या श्री एकमुखी दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव सुरू आहे.