Nashik Crime : नाशिकच्या (Nashik) चांदवडमधून (Chandwad) एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. चांदवड पोलीस ठाण्यामध्ये (Chandwad Police Station) महिलेचा मृतदेह ठेवून नातेवाईकांनी आंदोलन केल्याची घटना घडली आहे. प्रसूतीदरम्यान डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे या महिलेचा जीव केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून चांदवड पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्यात आले. दरम्यान तास दोन तासांनंतर पोलिसांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.


चांदवड तालुक्यातील प्रियंका निरभवणे या प्रसूतीसाठी चांदवड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती बिघडत असल्याने त्यांना मुंबई (Mumbai) येथील रुग्णाला दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरू असताना प्रियंका यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर उपचारासाठी लाखो रुपयांचे रक्कम उकळून देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपणा असल्याचा आरोप प्रियंका यांच्या नातेवाईकांनी केला यानंतर प्रियंकाच्या मृत्यू नंतर संतप्त नातेवाईकांनी आंदोलन केले. प्रियंका यांचा मृत शरीर चांदवड पोलीस ठाण्यामध्ये ठेवून नातेवाईकांकडून आंदोलन करण्यात आला कठोर कारवाई करावी ही मागणीही करण्यात आली आहे. 


दरम्यान घटना घडल्यानंतर संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन समोर गर्दी केली. यावेळी तणावाचे निर्माण झाले. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यावेळी नातेवाईकांनी घेतल्याचे पाहायला मिळाले. येथील डॉक्टरांनी उपचारादरम्यान प्रियंका निभवण्याची अन्ननलिका कापण्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आणि अशातच प्रियांका यांची प्रसूती झाल्याने लहान बाळाने आईला गमावल्याचा संतप्त सवाल यावेळी नातेवाईकांनी विचारला.


पोलिसांच्या आश्वासनानंतर शांतता
दरम्यान घटनेनंतर परिसरात तणाव झाल्यानंतर पोलिसांकडून नातेवाईकांना या प्रकरणात सखोल चौकशी केली जाईल अशी आश्वासन देण्यात आले आहे. तसेच रिपोर्ट आल्यानंतर काय ती कारवाई केली जाईल, मात्र पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी करू नका, कायदा सुव्यवस्था वेगळे असं काही कृत्य करू नका, असे आवाहन देखील पोलिसांनी नातेवाईकांना केलं तसेच मृतदेहाची विटंबना होत आहे  तरीही जोपर्यंत प्रकरण उघडकीस येत नाही रिपोर्ट येत नाही, तोपर्यंत मृतदेह येथे ठेवला. आणि तुम्ही सगळे नातेवाईक या ठिकाणी थांबले तरी पोलिसांना हरकत नाही. सकल चौकशी करून घटनेत कोणी 2008 असेल तर त्याच्यावर कारवाई होईल, असे यावेळी देखील यावेळी पोलिसांनी सांगितले दरम्यान काही वेळानंतर नातेवाईकांनी नमते घेत मृतदेह ताब्यात घेतला.