Nashik News : नाशिकमधून (Nashik) धक्कादायक बातमी समोर आली असून मनमाड (Manmad) येथील किल्ल्यावर फिरायला गेलेली दोन मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एकजण बुडत असताना दुसरा वाचविण्यासाठी गेला असताना दोघांचाही बुडून (Drowning) करुण अंत झाला आहे.
सध्या जिल्ह्यात पावसाची संततधार सुररूच असून विकेंड असल्याने पर्यटकांचा ओघ वाढत आहे. यातच अशा अनुचित घटना घडत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील अंकाई किल्ल्यावर (Ankai Fort) तळ्यात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारच्या सुमारास ही घडली घडली आहे. मिलिंद रवींद्र जाधव, रोहित पिंटू राठोड अशी दोन्ही बुडून मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहे. हे दोन्ही तरुण नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील असून धारणगाव रोडचे रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहराजवळील अंकाई हा प्रसिद्ध किल्ला आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. मात्र अनेकदा निसरडी वाट, तसेच पर्यटकांना किल्ल्याची माहिती नसल्याने अशा घटना समोर येतात. हे दोन्ही तरुण विकेंडची सुट्टी घालविण्यासाठी अहमदनगर येथून अंकाई किल्यावर आले होते. यावेळी किल्ल्यावर पोहचल्यानंतर ते फिरत असताना तलावात अंघोळीसाठी तलावात उतरले. मात्र तळ्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघांपैकी एकजण बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी दुसऱ्याने तलावात उडी मारली. त्याला वाचवत असताना दोघेही खाली बुडाले. यातच त्यांचा मृत्यू झाला.
संबंधित घटनेची माहिती इतर पर्यटकांना मिळताच ही बाब त्यांनी स्थानिक गावकऱ्यांना दिली. स्थानिक कार्यकर्ते असलेले राजूसिंग परदेशी यांना घटनेची माहिती येवला तालुका पोलिसांना कळविण्यात आली. दरम्यान यानंतर गावातील ग्रामरक्षक दलातील पोहणाऱ्या तरुणांच्या सहाय्याने बुडालेल्या दोघा तरुणांचा मृतदेह एक तासाच्या अथक प्रयत्नाअंती तलावातून बाहेर काढण्यात आला. घटनेने संपूर्ण परिरासरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पर्यटन करा, पण जपून....
सध्या सुरू असलेल्या श्रावण महिन्यात जिल्ह्यातील अनेक पर्यटनस्थळांवर पर्यटक गर्दी करत आहेत. अशावेळी माहितीचा अभाव, निसरड्या वाटा यामुळे पर्यटक धोका पत्करतात आणि अनुचित प्रकार घडतो. त्यामुळे पर्यटकांनी धोक्याच्या ठिकाणी न जाता सुरक्षित पर्यटन करणे आवश्यक ठरते.