Nashik Cyber Crime : अनेकदा सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटना सातत्याने घडत आहे. मात्र नेहमीच सायबर गुन्हेगार काही ना काही कारणातून ग्राहकांची फसवणूक करत असल्याचे दिसून येत आहे. अशातच नाशिक शहरात सायबर गुन्हेगारीचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. बँकेत असलेली सात लाखांची ठेव अज्ञात व्यक्तीने आभासी पद्धतीने व्यवहार करत काढून घेतल्याची धक्कादायक घटना नाशिक शहर परिसरात घडली आहे. या प्रकरणाचा तपास करत सायबर पोलिसांनी (Cyber Crime) तक्रारदाराला पाच लाख रुपयांची रक्कम परत मिळवून दिली आहे.


नाशिक (Nashik) शहरातील सातपूर परिसरातील भरत कासार यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (State Bank Of india) खाते आहे. त्यांनी खात्यावर सात लाख रुपये मुदत ठेव म्हणून ठेवले होते.  भ्रमणध्वनीवर संपर्क साधत एक लिंक पाठवत ओटीपी मिळवला त्यांच्या खात्यावरील रक्कम वेगवेगळ्या खात्यांवर हस्तांतरित केली. हा प्रकार कासार यांच्या उशिराने लक्षात आला. सायबर पोलीस ठाण्यात याविषयी संपर्क साधला असता फसवणूक झाल्याचे लक्षात आले. सायबर पोलिसांनी बँकेच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क करत हे व्यवहार थांबवण्याची सूचना केली. सायबर पोलिसांनी पैसे कुठे जाऊ शकतात याबाबत तपास करत संबंधितांना मेल केले. त्या अनुषंगाने तक्रारदाराच्या बँक खात्यातून काढून घेतलेल्या पैशांपैकी चार लाख 99 हजार 999 रुपये परत मिळवून दिले.


अशी उघडकीस आला प्रकार


घर विक्री करून आपल्या मुलीच्या लग्नासाठी कष्टाने जमवलेली सुमारे सात लाखांची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून पित्याने ठेवली होती. एका सायबर गुन्हेगाराने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधत पॅन कार्ड व्हेरिफिकेशन च्या नावाखाली लिंक पाठवली त्यानंतर एफडी परस्पर गहाण ठेवून ऑनलाईन पाच लाख 25 हजार रुपयांचे ओ डी लोन काढून रक्कम वेगळ्या तीन खात्यात वर्ग करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कासारे यांनी त्या लिंक द्वारे ॲप डाऊनलोड केल्यानंतर संशयित आणि त्यांना त्यांच्या बँक खात्याची माहिती नमुन्यात भरावयास सांगितली. त्या आधारे पाच लाख 25 हजारचे कर्ज मंजूर करून घेतो आणि ती रक्कम वेगवेगळ्या बँकांच्या तीन खात्यात वर्ग देखील काही तासात होते. याबाबत जेव्हा बँकेचे मेसेज कासार यांच्या मोबाईलवर येऊ लागले, तेव्हा त्यांच्या पायाखालची वाळू सरकली.


सायबर पोलिसांकडून आवाहन


आभासी पद्धतीने आपली फसवणूक झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्यास त्वरित सायबर पोलिसांची संपर्क साधा किंवा नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल हेल्पलाइन वन नाईन थ्री झिरो 1930 या क्रमांकावर संपर्क साधत तक्रार नोंदवावी ओटीपी देऊन आभासी पद्धतीने फसवणूक झाली असल्यास गृह मंत्रालय भारत सरकार आणि रिझर्व बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त हेल्पलाइन नंबर 15 52 60 वर तक्रार नोंदवावी असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे.