Nashik Corona vaccine : कोरोनाच्या (Corona) नव्या व्हेरिएंटचे संकट पुन्हा घोंघावत असताना व सरकार लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करीत असताना दुसरीकडे नाशिक (Nashik) जिल्ह्यात मात्र कोरोना लशींचा (Corona Vaccine) तुटवडा असल्याची बाब समोर आली आहे. गेल्या वीस दिवसांपासून जिल्ह्यातील कोविशिल्डच्या लशी संपल्या असून लोकांना लसीकरण केंद्राकडून परत फिरावे लागत आहे.
मागील दोन संपूर्ण जगभरात हाहाकार करणाऱ्या कोरोना पुन्हा परतला असून जगभरात धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर देशात सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक मंदिरांनी देखील मास्कसक्ती (Mask) बंधनकारक करण्यात आले आहे. तर दुसरीकडे कोरोनाचे संकट उभे असताना नाशिक जिल्ह्यात मात्र लसीचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. नाशिक जिल्ह्यात काही महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लोकांना दिलासा मिळाला. त्यामुळे लसीकरणात एक घट झाली होती, मात्र काही दिवसांपासून चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत असून त्यामुळे केंद्र व राज्य सरकार सतर्क झाले आहे. आरोग्यमंत्र्यांनी याबाबत बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना देखील केले आहेत. या अचानक बदललेल्या वातावरणामुळे लोकांमध्ये काहीशी भीती निर्माण झाली असून ते लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर जात आहेत, मात्र जिल्ह्यात कोविशील्ड लसीचा खडखडाट आहे तर काही केंद्रांवर कोवॅक्सिन (Covaxin) ही उपलब्ध नसल्याच्या तक्रारी आहेत.
जिल्ह्यात सुमारे 90 टक्के लोकांनी लसीचा पहिला तर 80 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. बूस्टर डोसचे प्रमाण मात्र नगण्य आहे. कोविशील्डचा पहिला डोस घेणाऱ्यांना दुसरा डोस यास लसीचा घ्यावा लागणार आहे, मात्र सध्या ही लस उपलब्ध नाही. काही दिवसांपासून लसीकरणाला प्रतिसाद नसल्याने पडून असलेला लस्सींची मुदत गेल्या पाच डिसेंबर रोजी संपुष्टात आली. त्यानंतर जिल्ह्याला या लसीचा पुरवठा होऊ शकलेला नाही. नाशिक जिल्ह्याला सुमारे 400 लसीकरण केंद्रे होती. सध्या अवघी 20 ते 25 केंद्रे कार्यान्वित आहेत. तर नाशिक शहरातील काही रुग्णालये , जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे फक्त कोवॅक्सिन लसच उपलब्ध आहे. आधीचे दोन डोस कोणत्याही लसीचे घेतले असले तरी कोवॅक्सिनचा बुस्टर डोस घेता येऊ शकतो. मात्र पहिला डोस कोविशिल्ड चा घेतला असल्यास दुसरा डोस याच लसीचा घ्यावा लागणार आहे. आशा व्यक्तीसाठी सध्या तरी लस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे.
नाशिक शहरात सुमारे 89 टक्के लोकांनी पहिला, तर 76 टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. कोविशील्ड घेणाऱ्यांची संख्या 85 टक्के आहे. नाशिकमध्ये कोव्हीशील्ड चे 21 लाख 80 हजार 905 तर कोवॅक्सिनचे 3 लाख 91 हजार डोस दिले. 5 डिसेंबर पासून नाशिक जिल्ह्याला कोविशिल्ड चा पुरवठा राज्याकडूनच झालेला नाही. सध्या कोवॅक्सिनच्या एक लाख लसी शिल्लक आहेत. मधल्या काळात लोकांकडून लसीकरणाला प्रतिसाद नव्हता, आता मागणीनुसार सुविधा दिल्या जातील. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी दिली आहे.