Sambhaji Bhide : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलेल्या महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत असून राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nashik NCP) वतीने आंदोलन केल्यानंतर क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले कला व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik) संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


संभाजी भिंडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका काही थांबता थांबत नाही. आधी 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्यदिन नाही, त्यानंतर आता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे वडील मुस्लीम होते, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांच्याकडून करण्यात आले आहे. यावरुन वाद सुरु असतानाच पुन्हा एकदा संभाजी भिडे यांच्याकडून साईबाबा (Saiababa) आणि महात्मा फुले यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले. यावरून राज्यभरात संतापाची लाट उसळल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक भागात आंदोलने (Protest) करण्यात आली. काही ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. तर काही पोलीस ठाण्यात गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. 


अमरावती (Amravati) येथील एका कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी, शिर्डीचे साईबाबा तसेच महात्मा ज्योतिराव फुले (Mahatma Fule) यांच्या बद्दल अपशब्द काढले होते. दरम्यान या प्रकारानंतर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संताप व्यक्त करून संभाजी भिडे यांच्या विरुद्ध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील काही पोलीस ठाण्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करून गुन्हे दाखल झाले आहेत. आता नाशिकरोड पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरातील क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते संतोष गाडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नाशिकरोड पोलीस ठाण्यात संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार अमरावती येथे घडला असल्याने हा गुन्हा अमरावती पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.


सांस्कृतिक मंडळाच्या वतीने तक्रार 


क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले कला व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने माजी आमदार योगेश घोलप यांच्या नेतृत्वाखाली योगेश गाडेकर, जयंत गाडेकर, सुधाकर जाधव, शंकर मंडलिक, संतोष गाडेकर, विशाल गाडेकर, केशव पोरजे, भैय्या मनियार, विकास गीते, पुरुषोत्तम फुलसुंदर, भारत जेजुरकर, किशोर अहिरे, प्रशांत जेजुरकर, सागर महाजन, सुनील गांगुर्डे आदींनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त आनंद वाघ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास वांजळे यांची भेट घेऊन शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.


 


ईतर संबंधित बातम्या : 


Sambhaji Bhide: 'भिडे संभाजीनगरातून परत कसा जातो पाहतोच..'; ठाकरे गटाचा थेट इशारा