Mahatma Jyotiba Phule Jayanti 2023 : देशात मुलींची पहिली शाळा सुरू करणारे समाजसुधारक महात्मा फुले (Mahatma Jyotiba Phule) यांची आज जयंती आहे. सामाजिक चळवळीतील त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक असलेल्या महात्मा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1987 रोजी पुण्यात झाला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या कलाकृतींबद्दल जाणून घ्या...
सत्यशोधक - नाटक : गो. पु. देशपांडे लिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित 'सत्यशोधक' या नाटकाचे रंगभूमीवर प्रयोग सुरू आहेत. महात्मा फुलेंच्या विचारांवर आधारित असलेलं हे नाटक आहे. फुलेंचे विचार भाषेच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा नवा सेतू बांधतात हे या नाटकाचं यश आहे.
गुलामगिरी - ऑडिओ बुक : महात्मा फुले यांनी 100 वर्षांपूर्वी लिहिलेलं 'गुलामगिरी' हे पुस्तक ऑडिओ स्वरुपात उपलब्ध आहे. समाजातील भेदभावांवर भाष्य करणारं हे पुस्तक आहे. या मराठी पुरस्काचा डॉ. विमलकिर्ती यांनी हिंदी भाषेत अनुवाद केला.
भारत एक खोज - सीरिज : 'भारत एक खोज' ही सीरिज पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या ग्रंथावर आधारित असली तरी या सीरिजच्या एक भाग महात्मा फुलेंवर आधारित होता. युट्यूबवर ही सीरिज प्रेक्षक पाहू शकतात. श्याम बेनेगलने या सीरिजचं दिग्दर्शन केलं होतं.
सार्वजनिक सत्यधर्म - ग्रंथ : 'सार्वजनिक सत्यधर्म' हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता. हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर इ.स, 1891 मध्ये प्रकाशित झाला होता.
सत्यशोधक - चित्रपट : महात्मा फुले यांच्या आयुष्यावर आधारित असेलला 'सत्यशोधक' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात महात्मा फुलेंच्या भूमिकेत संदीप कुलकर्णी दिसणार आहे. निलेश जळमकर यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त या सिनेमाचा टीझर आऊट करण्यात आला आहे.
फुले - चित्रपट : महात्मा फुलेंच्या जीवनावर आधारित अनेक नाटक आणि चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आली. काही महिन्यांपूर्वी 'फुले' (Phule) या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं होतं. या सिनेमाचं कथानक महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. 'फुले' या सिनेमात अभिनेता प्रतिक गांधी (Pratik Gandhi) हा महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री पत्रलेखा (Patralekha) ही सावित्रीबाई फुले यांची भूमिका साकारणार आहे.
संबंधित बातम्या