Nashik chhagan Bhujbal : सत्यजीत तांबेंना (Satyajeet Tambe) उमेदवारी द्यावी असे सांगितले असते तर दिले असते. उमेदवारी घेऊन त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही हे अतिशय वाईट झाले. यामुळे बाळासाहेब थोरात अडचणीत आले. शिवाय भाजपाचा पाठिंबा तांबे यांना मिळेल अस वाटत आहे. राजकारणात अशा गोष्टी होत असतात, पण आपलं कुटूंब मजबूत असेल तर घर फुटत नाही. काँग्रेसमध्ये काय झालं अजून कळाले नाही, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली. 


गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर आज छगन भुजबळ यांनी मौन सोडले. नाशिकमध्ये (Nashik) पत्रकार परिषद घेत त्यांनी तांबे कुटुंबाच्या निर्णयावर पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, डॉ. सुधीर तांबे दोन ते तीन वेळा आमदार झाले असून त्यांच्या बद्दल माझ्या मनात चांगल्या भावना आहेत. तांबे माझ्याकडे आले होते, त्यावेळी मी त्यांना पाठिंबा देतो असे सांगितले. गेल्या तीन वेळा आमदार असल्याने त्यांच्याबद्दल नागरिकांच्या देखील चांगल्या भावना आहेत. पण त्यांनी अचानक अस का केले, हे मला देखील कळाले नाही. शिवाय भाजपाचा पाठिंबा तांबे यांना मिळेल अस वाटत आहे. राजकारणात अशा गोष्टी होत असतात, पण आपलं कुटूंब मजबूत असेल तर घर फुटत नाही. काँग्रेसमध्ये काय झालं अजून कळाले नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. 


छगन भुजबळ पंकजा मुंडे (Pankaja Mundhe) प्रकरणावर म्हणाले कि, राजकारणात वेगवेगळ्या कारणांमुळे नाराज असतात. कुठल्या न कुठल्या कारणामुळे नेते नाराज असतात. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याबाबत ते म्हणाले कि, बावनकुळे यांच्या बाबतीत मी ऐकत असतो. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत, म्हणून त्यांना बोलावं लागत. एयणाऱ्या निवडणुकीत समजेल कि, 184 होणार की कमी होणार आहेत. शिवाय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह  भरण्यासाठी बोलावं लागत. आमदार गेले तरी मतदार जाता अस नाही. त्यामुळे सगळ्यात मोठ कोर्ट न्यायालय आहे. मोदी मुंबई दौऱ्यावर भुजबळ म्हणाले, चांगली गोष्ट आहे, ते येतात. शहरात राज्यात विकास करण्यासाठी केंद्राने निधी देणे आवश्यक आहे. दुसरीकडे शिंदे महाविकास आघाडीत असताना ही कामं सुरू होती. आता पुन्हा अशीच कामे केली जात आहेत, त्यामुळे पैशांचा अधिकाधिक वापर होतो असल्याचे भुजबळ म्हणाले. 


ओबीसी आरक्षणावर ते म्हणाले कि, सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानुसार हायकोर्टात जावं लागणार आहे. शिवाय ओबीसी आरक्षणाबाबतीत केंद्राची भूमिका अयोग्य आहे. अशी भूमिका घ्यायला नको होती. सुमित्रा महाजन यांच्या कमिटीने देखील ओबीसीने फंड द्यायला हवे अस सांगितलं होते. मनमोहन सिंह यांच्या काळात आलेल्या कमिटीनेही हीच भावना व्यक्त केली होती. डाटा नसल्यामुळे लाभ देता येत नाही, अस दोन्ही समित्यांनी सांगितले, मात्र भाजपला हे सगळ का अडचणीचं वाटत हे माहीत नाही. हा विषय राजकारणाचा नाही, मात्र ओबीसी पाठीराखे आहे, अस म्हणतात तर त्यांना डाटा द्यायला हवा असा खोचक टोला भुजबळांनी या माध्यमातून दिला. 


संजय राऊत सध्या काश्मीर दौऱ्यावर असून ते भारत जोडो यात्रेत सहभागी झाले आहेत. यावर ते म्हणाले, भारत जोडो यात्रा वैशिष्ट्य पूर्ण असून तिथली थंडी आणि तिथल राजकारण दहशत वाद त्यामुळे तिकडे जाणे महत्वाचं आहे. शिवसेना सोबत राहील अस ते म्हणाले आहे. त्यामुळे उद्धव साहेब आणि ते, काय आहे ते बघतील. अजून त्यांच्यात काही निश्चित झालं अस वाटत नाही. आता प्रयत्न केला तर यश मिळेल. शिवाय शिंदे ठाकरे गटाच्या निर्णयाची आम्ही देखील वाट बघत आहोत. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने अनेक बाबी असून घटना देखील आहे. त्याचबरोबर शिंदे गटाने नेमणुका केल्या आहेत, त्या बेकायदेशीर असल्याचे बोललं जात आहे, असेही भुजबळ म्हणाले. 


मी पालकमंत्री असताना... 


काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये ठाकरे शिंदे गटाचा भांडण टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले. शिवजन्मोत्सव निमित्ताने सुरु असलेल्या अबिटकीत हवेत गोळीबार करण्यात आला. यावर बाहुबल म्हणाले कि, राजकीय पक्षांनी इतपर्यंत जाऊ नये, जे आहे ते बसून मिटवावे. मात्र घटना घडली अतिशय निंदनीय असून पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मी पालकमंत्री असताना अस घडल तर अनेक जण ओरडत होते, ते आता बोलत नाही. पोलिसांनी कुणाच्याही दबावला बळी न पडता कारवाई करावी, असेही ते म्हणाले.