Maharashtra News: एबीपी माझाच्या बातमीनंतर राष्ट्रवादीचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोमवारी सायंकाळी सशस्त्र सीमा बलात दाखल होऊन अपघाती निधन झालेल्या गायत्री जाधवच्या निफाड तालुक्यातील देवगावच्या घरी जात कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. गायत्रीच्या सर्व ईच्छा पूर्ण करण्याचे ते प्रयत्न करणार आहेत. एक भाऊ म्हणून गायत्रीच्या एका बहिणीचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले आहे.


नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) पाहिल्या मिलेट्री गर्लचे निधन झाले. या निधनानंतर गायत्री जाधवच्या कुटुंबावर डोंगरच कोसळला. ही डोळ्यांत पाणी आणणारी बातमी काही दिवसांपूर्वी एबीपी माझाने दाखवली. यानंतर काल आमदार रोहित पवार हे नाशिक दौऱ्यावर होते. तत्पूर्वी त्यांनी निफाड तालुक्यातील देवगाव येथील गायत्रीच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी जाधव कुटुंबीयांना आधार देत गायत्रीच्या बहिणींचा सर्व खर्च उचलणार असल्याचे सांगितले. 


रोहित पवार पुढे म्हणाले, गायत्रीने उपचार घेतलेल्या रूग्णालयांशी संपर्क साधत बिलात सवलत मिळवून देऊन सशस्त्र सीमा बलाच्या अधिकाऱ्यांकडे देखील वैद्यकीय सेवा आणि इतर सुविधांबाबत ते पाठपुरावा करणार आहेत. कुटुंबाला जी मदत लागेल ती करण्याचा माझा, छगन भुजबळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न राहणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. 


यासोबत छगन भुजबळ देखील मदत करणार आहेत. लहान बहिणीला वकील व्हायचय, गायत्रीसारखाच तिचा कॉन्फिडन्स असून तिच्या शिक्षणाचा खर्च भाऊ म्हणून उचलणार आहे. त्यासोबत इतर पाठपुरावा करू. जी मदत लागेल ते करेन, त्यासाठी सर्व प्रयत्न करेल, असे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले. 


एबीपी माझाही बातमी बघितली अन्...


गायत्री जाधव खूप गरीब आणि शेतात मंजुरी करणाऱ्या घरातील ती होती. लहान पणापासून खूप कष्ट तिने घेतले. सैन्यात दाखल होऊन तिचे स्वप्न ती पूर्ण करत असतांनाच तिचा एक अपघात झाला, कुटुंबाने वाचवण्याचे सर्व प्रयत्न केले पण ती शहीद झाली. एबीपी माझाच्या माध्यमातून आपण बातमी केली त्याबद्दल तुमचे अभिनंदन, सामाजिक आणि भावनिक विषय तुम्ही कव्हर केला. कुटुंबाच्या अडचणी तुम्ही दाखवल्या आणि ती बातमी बघितली. अन् गहिवरून आल्याचे पवार म्हणाले.