Nashik News : आगामी मकरसंक्रांति निमित्त (Makarsankranti) पुन्हा एकदा बाजारात पतंग मांजा (Nylon Manja) खरेदी विक्रीला वेग येऊ लागला आहे. पतंगबाजीसाठी साधा दोरा वापरावा, नायलॉन व काच मांजावर बंदी असून पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी यापूर्वीच नायलॉन मांजा खरेदी विक्रीवर आयुक्तालयाच्या हद्दीत बंदी जाहीर केली आहे. मात्र नाशिक शहरात पोलिसांकडून 1 लाख 84 हजार रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. 


दरम्यान नायलॉन मांजाचा वापर हा मानवी जीवित हस्तक्षेप पक्षांच्या जीविताला धोका निर्माण करणारा असून यामुळे माणसांसह पक्षांना देखील इजा होण्याची शक्यता असते. यामुळे नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीत नायलॉन मांजा खरेदी विक्री वापरास सक्त मनाई करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पोलीस पथके गस्त घालत असताना जुने नाशिक, पंचवटी व सरकार वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान जुन्या नाशिकमधील कुंभारवाडा परिसरात सापळा रचत संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून नायलॉनचा मोनी काईट मांजाचे वेगवेगळे पन्नास गट्टू सुमारे 28 हजार किमतीचे जप्त करण्यात आले आहेत.


तर दुसऱ्या घटनेत पंचवटी पोलिसांच्या हद्दीत घडली आहे. गंगाघाटावर नायलॉन मांजाच्या विक्री करणाऱ्या संशयितास सापाला रचून पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा संशयित गोदावरी परिसरातील गंगा घाट येथील सार्वजनिक शौचालय समोर नायलॉन मांजाची विक्री करताना आढळून आला. संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेत टायच्याकडून 48 हजार रुपयांचे 48 गटू जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी आकाश उर्फ शुभम धनवटे याच्या विरुद्ध पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे


तर सरकार वाडा पोलिसांच्या हद्दीत पकडले पगडबंद लेन दहिपुर परिसरात संशयित जॅकी सुरेश चंदनानी, मनीष प्रकाश लेडवाणी हे विक्री करण्यास बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करत असल्याबाबत माहिती मिळाली. सरकारवाडा पोलिसांनी सापळा रचून नायलॉन मांजाची विक्री करत असताना असताना संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जवळपास एक लाख 7 हजार 800 रुपये किमतीचा नायलॉन मांजाचे 129 गट्टू हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांच्याविरुद्ध सरकार वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस आयुक्त यांनी नायलॉन माझ्याशी खरेदी विक्री आणि वापरावर बंदी घातली आहे याबाबत स्वतंत्र अधिसूचनाचे अधिकारण्यात आले आहे यानुसार शहरात कोणीही या अधिसूचनेचे उल्लंघन करू नये अन्यथा त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल सर्व पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना नायलॉन मांजा खरेदी-विक्री विरोधी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सांगितले