Jalgoan News : देशसेवा काय असते, देशप्रेम काय असते? हे नुसतं सांगून होत नसत. पोटचा मुलगा शहीद झाला असताना देखील दुसरा मुलगा देशसेवेसाठी देण्यासाठी तयार झालेल्या आईचे प्रेम पाहून देशप्रेम काय असत हे लक्षात येत. याचा प्रत्यय जळगाव जिल्ह्यात आला आहे.  


जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील घटना आहे. पहिल्या शहिद मुलाचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसरा मुलगा ही देशाच्या बलिदानासाठी समर्पित केला आहे. या घटनेने देशसेवेप्रति असलेले आईच प्रेम पाहून उर अभिमानानं भरून आल्याशिवाय राहणार नाही, असच या मातेकडं पाहून वाटत. जम्मू काश्मीर येथील 26/11 च्या हल्ल्यात जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश देशमुख हा शहीद झाला होता, परिवारातील एक जण शहीद झाला असताना त्याचे देश सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याचा लहान भाऊ देखील सैन्य दलात (Indian army) भरती झाला असून भावाचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा आशीर्वाद या वीर जवानांच्या आईने दिला आहे. 
     
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख हा जम्मू काश्मीर येथील 26/11च्या हल्यात शहीद झाला होता. या घटने नंतर संपूर्ण चाळीसगाव परिसरात शोककळा पसरली होती. घरातील एखाद्या कर्त्या मुलाचा  मृत्यु झाल्यानंतर कदाचित कोणतीही माता आपला दुसरा मुलगा देशासाठी देण्यासाठी सहजांसहजी तयार होणार नाही. मात्र आपल्या मोठ्या मुलाचे देश सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरेखा देशमुख या आईने आपला लहान मुलगा पंकज देशमुख याला ही सैन्य दलात भरती केले आहे. 


मेकॅनिकल इंजिनियर पूर्ण केलेल्या पंकज हा देखील भारतीय सैन्य दलात भरती झाला आहे. पंकज म्हणाला, इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर अनेक कंपन्यांकडून  चांगल्या पगाराच्या नोकरीची ऑफर्सही मिळाल्या. मात्र जम्मू काश्मीर येथील हल्यात शहीद झालेल्या आपल्या मोठ्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सैन्य दलात जात असल्याची भावना जवान पंकज देशमुख यांनी बोलून दाखविली आहे. आपल्या परिवारातील एक मुलगा शहीद असताना दुसरा मुलगा ही देशाच्या साठी सुपूर्द करणाऱ्या आपल्या परिवाराचा गर्व आणि अभिमान असल्याचं ही पंकज यांनी म्हटल आहे. आपला मोठा मुलगा यश हा शहीद झाल्यानंतर त्याचं देश सेवेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दुसरा मुलगा सुद्धा भारत मातेसाठी आपण देत आहोत, एक मुलगा शहीद झाला असला तरी छातीवर दगड ठेऊन देशासाठी निर्णय घेत असल्याचं वीर माता सुरेखा देशमुख यांनी म्हटल आहे. 


दरम्यान मुलाला निरोप देताना आई सुरेखा देशमुख यांनी म्हटल आहे की, आपला एक भाऊ गेला असला तरी तू आता ज्यांच्या सोबत राहणार आहे, ते सर्व तुझे भाऊ आहेत, आणि मी त्यांची आई असल्याचा सल्ला या मातेने आपल्या मुलाला दिला आहे. एक जवान शहीद झाला असताना दुसरा मुलगा पुन्हा सैन्यात भरतीसाठी जात असताना सुरेखा देशमुख यांनी आपल्याला अश्रूंना बांध घालून ज्या पद्धतीने आपल्या वीर मातेचा परिचय दिला तो पाहता, यांच्या सारख्या वीर माता या देशात असल्यानेच महाराष्ट्र ही वीर जवानांची भूमी म्हणून आजही ओळखली जाते.