Nashik News : लग्न (Marriage) म्हटलं की अनेकदा मानपान, डीजे, नवरा नवरीची मिरवणूक आणि इतर बाबींवर अनावश्यक खर्च केला जातो. अनेक जण तर त्यांनी केलं म्हणून आपल्यालाही चांगलंच लग्न करायचं या इर्षेने वारेमाप खर्च करत असतात. मात्र अलिकडे साध्या पद्धतीने विवाह करण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे दिसून येते. याच गोष्टीला महत्त्वा देऊन नाशिकमध्ये (Nashik) मुस्लिम समाजाच्या (Muslim Community) वतीने महत्वपूर्ण मोहीम सुरु करण्यात आली आहे. 


अनेकदा लग्न समारंभात अनावश्यक खर्च केला जातो. कर्जबाजरी होऊ मात्र लग्न धुमधडाक्यात झाले पाहिजे, अशी अनेकांची धारणा असते. मात्र या गोष्टीला फाटा देत नाशिक (Nashik) शहरातील शहर-ए-काझी सय्यद एजाजुद्दीन काझी यांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. डीजे लावणाऱ्यासह (DJ) निकाहवर अनावश्यक खर्च जेथे आहे तेथे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कमी खर्चात साध्या पद्धतीने निकाह (Nikah) करण्याची विशेष मोहीम सुरु केली असून याबाबत शहरात जनजागृतीही केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या या निर्णयाला चांगला प्रतिसाद दिला जात असून कौतुक केले जात आहे. 


अनेकदा लग्नात केलेल्या अनावश्यक खर्चामुळे कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळते. त्यामुळे साध्या पद्धतीने विवाह केल्यास इतर अडचणीना तोंड द्यावे लागत नाही. मुस्लिम धर्मात निकाहवेळी मुलीच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवू नये, आर्थिक देवाणघेवाणीवरुन शुभकार्यात अडथळा येऊ नये यासाठी साध्या पद्धतीने निकाह करण्याची शिकवण आहे. मात्र सद्यस्थितीत हे चित्र बदलल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा गोष्टींपासून समाजास परावृत्त करण्यासाठी नायब शहर-ए-काझी सय्यद एजाजुद्दीन काझी यांनी विशेष मोहीम सुरु केली आहे. डीजे लावणाऱ्यासह निकाहवर अनावश्यक खर्च जेथे आहे तेथे बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, कमी खर्चात साध्या पद्धतीने निकाह करण्याची विशेष मोहीम नायब सुरु केली असून याबाबत शहरात जनजागृतीही केली जात आहे.


साध्या पद्धतीने निकाह करावा


दरम्यान शहर-ए-काझी सय्यद एजाजुद्दीन काझी यांनी सुरु केलेल्या विशेष मोहीमेअंतर्गत आवाहन करण्यात आले आहे. यात साध्या पद्धतीने निकाह करावा. भेटवस्तू, आहेर, हुंडा या प्रथांना आळा घालावा. वाचलेल्या पैशांतून मुलीचे भविष्य कसे घडवता येईल हे पाहावे. मुलीच्या नावावर बँकेत ठेवी ठेवणे, शिक्षण, रोजगारासाठी त्या रकमेचा वापर करुन मुलगी स्वावलंबी होण्यास मदत करता येईल. लग्नातील खाद्यपदार्थांवर अधिक खर्च करु नये. डीजेवर बंदीसह वाजंत्री, सजावट, भेटवस्तू देणे-घेणे, आहेर असा अवाजवी खर्च टाळावा. मुलीचा हक्क आणि सुरक्षा यासाठी मेहरची अधिक रक्कम असावी. परिस्थिती नसल्याने समाजातील अनेक मुलींचे वय वाढूनही त्यांचा निकाह होत नाही. हे टाळण्यासाठी शहर-ए-काझी सय्यद एजाजुद्दीन काझी यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.