Nashik Memu Railway : भुसावळ-इगतपुरी रेल्वेने (Bhusawal Igatpuri Memu) प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी असून पुढील दोन दिवस मेमू रेल्वे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे नियोजन कोलमडणार आहे. शिवाय पुढील आठवड्यात सण उत्सव अधिक असल्याने प्रवाशांची तारांबळ उडणार आहे. रेल्वेच्या भुसावळ (Bhusawal) विभागातील पाचोरा स्थानकात (Pachora Station) रिमॉडलिंगच्या कामामुळे 14 आणि 15 ऑगस्टला भुसावळ-इगतपुरी मेमू रद्द करण्यात आली आहे. परतीच्या मार्गावरही इगतपुरी-भुसावळ मेमू दोन दिवस रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.


कोरोना काळात (Corona Crisis) प्रवाशाचे हाल होते. यामुळे स्थानिक रेल्वे प्रवाशांनी याबाबत मेमू रेल्वे सुरु करण्यात मागणी केल्यानंतर भुसावळ-इगतपुरी हि मेमू रेल्वे सुरु करण्यात आली. त्यानंतर सध्या मेमू रेल्वेमुळे अनेक चाकरमान्यांचे ये जा करण्याची सोय झाली आहे. दरम्यान भुसावळ- इगतपुरी ये जा करणारी ही मेमू रेल्वे पाचारो जवळ दुरुस्तीचे काम असल्याने दोन दिवस बंद असणार आहे. 


दरम्यान रेल्वेच्या भुसावळ विभागातील पाचोरा स्थानकात दुरुस्तीच्या कामामुळे येत्या 14 आणि 15 ऑगस्टला भुसावळ-इगतपुरी मेमू रद्द करण्यात आली आहे. तसेच परतीच्या मार्गावर गाडी क्रमांक 11119 इगतपुरी-भुसावळ मेमू 15 आणि 16 ऑगस्टला रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. मुंबईहून भुसावळला येणाऱ्या डाउन रेलवे गाड्यांमध्ये 12627 बेंगळुरू-दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस एक तास १० मिनिटे, गाडी क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनन्स-गोरन्पूर गोदान एक्स्प्रेस एक तास 10 मिनिटे, गाडी क्रमांक 12715 नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस 20 मिनिटे, गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर पवन एक्स्प्रेस वीस मिनिटे उशिरा धावेल.


तसेच भुसावळमार्गे मुंबईला जाणाऱ्या अप गाड्यांमध्ये गाडी क्रमांक 22456 कालका-साईनगर शिर्डी द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस, 22512 कामाख्या-एलटीटी वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 12108 सीतापूर-एलटीटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 17324 बनारस-हुबळी साप्ताहिक एक्स्प्रेस, गाडी क्रमांक 11072 बनारस-एलटीटी कामायनी एक्स्प्रेस या गाड्या सव्वा दोन तास उशिरा धावेल. गाडी क्रमांक 11058 अमृतसर-मुंबई एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक 22537 गोरखपूर-एलटीटी या गाड्या 50 मिनिटे, गाडी क्रमांक 11062 जयनगर-एलटीटी पवन एक्स्प्रेस 25 मिनिटे उशिरा धावेल.


14 ऑगस्टला सुरुवातीच्या स्थानकापासून अमरावती-मुंबई एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. परतीच्या मार्गावर मुंबई-अमरावती गाडी 15 ऑगस्टला मुंबईतून रद्द झाली आहे. नागपुर-मुंबई-सेवाग्राम एक्सप्रेस 14 ऑगस्टला प्रारंभीच्या स्थानकातून तर परतताना मुंबई-नागपुर सेवाग्राम 15 ऑगस्टला रद्द झाली आहे. मुंबईहून भुसावऴला येणार्‍या डाउन रेलवे गाड्यांमध्ये बेंगलुरु-दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस 1 तास 10 मिनीटे, लोकमान्य टिळक टर्मिनंस-गोरखपुर गोदान एक्सप्रेस 1 तास 10 मिनीटे, नांदेड़-अमृतसर सचखंड एक्सप्रेस 20 मिनीटे, लोकमान्य टिळक टर्मिनस-जयनगर पवन एक्सप्रेस 20 मिनीटे उशीरा धावणार आहे. भुसावळहून मुंबईला जाणार्‍या अप गाड्यांमध्ये कालका-साईंनगर शिर्डी व्दिसाप्ताहिक एक्सप्रेस, कामाख्या-एलटीटी वातानुकूलित साप्ताहिक एक्सप्रेस, सीतापुर-एलटीटी एक्सप्रेस, बनारस-हुबळी साप्ताहिक एक्सप्रेस, बनारस-एलटीटी कामायनी एक्सप्रेस या गाड्या सव्वादोन तास उशिरा धावणार आहेत.



रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाचे... 
अमरावती-मुंबई एक्स्प्रेस 14 ऑगस्टला सुरुवातीच्या स्थानकापासून रद्द करण्यात आली आहे. परतीच्या मार्गावर गाडी क्रमांक 12111 मुंबई-अमरावती गाडी 15 ऑगस्टला मुंबईतून रद्द झाली आहे. गाडी क्रमांक 12140 नागपुर-मुंबई-सेवाग्राम एक्स्प्रेस 14 ऑगस्टला प्रारंभीच्या स्थानकातून तर परतताना 12139 मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस 15 ऑगस्टला रद्द झाली आहे.


मेमू रेल्वे प्रवाशांना सुखकर 
कोरोना काळात प्रवाशांचे हाल सुरु होते. यामुळे ये जा करणाऱ्या प्रवाशांनी मागणी केल्यानंतर भुसावळ इगतपुरी या मार्गावर मेमू रेल्वे सुरु करण्यात आली. दरम्यान दैनंदिन कामासाठी ये जा करण्या नागरिकांसाठी या मेमू रेल्वेचा चांगलाच फायदा झाला. तत्पूर्वी मेमू गाडी सुरू करावी या प्रवाशांच्या मागणीची दखल घेत मध्यंतरी भुसावळ-बडनेरा व भुसावळ-इटारसी मार्गावर मेमू गाडी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर जानेवारीपासून भुसावळ-इगतपुरी मेमू धावणार धावत असून यामुळे नाशिक, कल्याणला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल.