Nashik News : खेळता खेळता बाळानं नेलकटर गिळलं! नाशिकमध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करत वाचवलं!
Nashik News : नाशिक (Nashik) शहरातील नाशिकरोड (Nashikroad) परिसरात आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर (Nail cutter) गिळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Nashik News : तुमच्या घरात लहान मुल असेल तर ही बातमी महत्वाची आहे. मुलांकडे लक्ष न दिल्याने काय होऊ शकते, याचे उदाहरण ही घटना आहे. नाशिक (Nashik) शहरातील नाशिकरोड (Nashikroad) परिसरात आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर (Nail cutter) गिळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनी नेलकटर बाहेर काढण्यात आल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. आशिष शिंदे अस या बाळाचे नाव आहे.
लहान मुलं अनेकदा समोर असलेली वस्तू उचलून तोंडात टाकण्याच्या प्रयत्न करत असते. अशावेळी पालकांनी सजग राहून मुलांकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरते. मात्र काहीवेळा लक्ष नसताना लहान मुलं काहीही गिळून टाकते. अनेकदा आपण बाळाने कॉईन, किंवा इतर वस्तू गिळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र नाशिकमध्ये आठ महिन्यांच्या बाळाने हे नेलकटर गिळलं. सुदैवाने ही बाब लक्षात बाळाच्या आईच्या लक्षात आली आणि त्यानंतर या बाळावर शस्त्रक्रिया करून हे नीलकटर बाहेर काढण्यात आलं आणि बाळाची प्रकृती ही व्यवस्थित आहे समोर आलं होतं.
आठ महिन्याच्या मुलाने खेळता खेळता बेबी नेलकटर गिळल्याची घटना काल दुपारी नाशिकरोड परिसरात घडली होती. मुलाने नेलकटर गिळल्याचं लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला आडगावच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तात्काळ शस्त्रक्रिया करत नेलकटर बाहेर काढले. मुलाची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
नेमकी घटना कशी घडली?
नाशिक रोड परिसरामध्ये काल दुपारी हा प्रकार घडला होता. हा मुलगा घरामध्ये खेळत असतानाच त्याच्या हातामध्ये नेलकटर आल्यानंतर ते खेळत असताना त्याने ते गिळलं. यावेळी बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचा आईने बघितला. बाळाच्या आईने तात्काळ नाशिकच्या आडगाव परिसरातील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी बाळावरती शस्त्रक्रिया करत नेलकटर बाहेर काढले. सध्या मुलाची प्रकृती असून त्याला कुठलीही पोहोचलेली नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.