Nashik PFI : गेल्या काही दिवसांपासून पीएफआय (PFI) संघटना चर्चेत आहे. मध्यंतरी नाशिकमध्ये (Nashik) ताब्यात संशयितांना न्यायालयात हजर केले असताना धक्कादायक खुलासे समोर आले होते. त्यानंतर आज पुन्हा एका पदाधिकाऱ्याला एटीएसने ताब्यात घेतले असून त्यास न्यायालयात हजार करण्यात आले आहे. त्यामुळे पीएफआयची पाळेमुळे नाशिकमध्ये खोलवर रुजल्याचे या प्रकरणावरून दिसून येत आहे. 


महिनाभरापूर्वी राष्ट्रीय तपास संस्था व एसटीएसने देशभरात छापेमारी केल्यानंतर केंद्र सरकारने देखील गंभीर दखल घेत पीएफआय संघटनेवर बंदी घातली. त्यानंतर राज्यातील अनेक भागवुन देखील पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांना एटीएसने ताब्यात घेतले. तर राज्यातील जिल्ह्यात असलेल्या पीएफआयच्या कार्यालयांना देखील टाळे ठोकण्यात आले. मात्र त्यानंतर देखील एटीएसचे कारवाई सुरु असून नाशिकमधून पीएफआयच्या आणखी एका सदस्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे पीएफआय प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे दिसून येत आहे. 


काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon), कोल्हापूर, औरंगाबादसह (Aurangabad) राज्यभरातून दहशतवादी कारवाया करण्याच्या संशयावरून राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विराेधी पथकाने अटक केलेल्या पाॅप्युलर फ्रंड ऑफ इंडियाच्या (PFI) पाच संशयितांना अटक करण्यात आली हाेती. त्यानंतर काल पुन्हा जळगाव जिल्ह्यातून एका सदस्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेतलेल्या पीएफआय सदस्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. त्यामुळे काही वेळात या सदस्याची कोठडीत रवानगी होण्याची शक्यता आहे. 


दरम्यान देशविघातक कारवाया आणि समाजात अशांतता निर्माण करण्याच्या आरोपाखाली पाच जणांना अटक करण्यात आली होती. या पाचही जणांना मागील सोमवारी एटीएसने न्यायालयात हजर केली. यावेळी 3 ऑक्टोंबर रोजी केलेल्या दाव्यानुसार तपासातील मुद्दे मांडून पाचही जणांच्या विघातक कृत्यांच्या प्रयत्नासंदर्भातील माहिती न्यायालयात देण्यात आली. दरम्यान पीएसआय संदर्भात तांत्रिक विश्लेषणातून तपास करण्यात आला. त्याद्वारे मिळालेली माहिती न्यायालय सादर करण्यात आली. यावेळी तपासात अनेक धक्कादायक बाबी झाल्याचे निदर्शनास आले. राम मंदिर पाडून पुन्हा बाबरी मस्जिद उभारण्याचा प्लॅन असल्याचं मागच्या सुनावणी दरम्यान माहिती पुढे आली होती. 


सोमवारी झाली सुनावणी 
सोमवारी जिल्हा व सत्र ऑनलाईन पद्धतीने सुनावणी घेण्यात आली होती. यावेळी तपासी पथकाकडून विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद केला होता. यावेळी संशयितांचा सदस्यांचा व्हॉट्स अँप ग्रुप असून या ग्रुपचा ॲडमिन पाकिस्तानात असल्याचे चौकशीत समोर आले होते. या ग्रुपमध्ये भारत, पाकिस्तानसह, अमिराती, अफगाणिस्तान देशांमधील सदस्य सहभागी आहेत. दहशतवाद विरोधी पथक या ग्रुपमधील संदेशांची छाननी करत आहे. मालेगाव, बीड, नांदेड येथून पाच संशयितांना नाशिकच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती.