Amit Thackeray Nashik : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) हे नाशिक (Nashik) जिल्हा दौऱ्यावर असून येवला (Yeola) शहर परिसरात असताना त्यांना फुटबॉल (FootBall) खेळण्याचा मोह आवरला नाही. यावेळी उदघाटनाबरोबर त्यांनी यावेळी मनसोक्त फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला. याचबरोबर अमित ठाकरे यांनी फुटबॉलला दिलेल्या किकमुळे नाशिकसह जिल्ह्यात मनसेलाही अशीच 'किक' बसणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून मनविसेचे युवा नेते अमित ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांचा तिसरा दिवस आहे. दरम्यान काल त्यांनी येवला मालेगाव परिसर पिंजून काढला यावेळी त्यांनी एका शाळेत फुटबॉलचे टर्फचे उदघाटन केले. त्यावेळी त्यांनी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधत फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. दरम्यान नाशिक दौऱ्यावर आलेल्या अमित ठाकरे यांनी यांनी नाशिक मनसेला चांगलाच देण्यास सुरवात केली आहे. तब्बल चार दिवसांचा दौरा असून त्यात तीन दिवस हे फक्त नाशिक ग्रामीण साठी डोळे असल्याने यावरून मनसे जोरदार पुनर्बांधणी करत असल्याचे या दौऱ्यावरून दिसून येते.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अमित ठाकरे हे काल येवला दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचे विंचूर चौफुलीवर जोरदार स्वागत करण्यात आले. येवला शहरात असताना त्यांनी विद्या इंटरनॅशनल स्कूल धानोरे येथे भेट दिली. यावेळी येथील विद्यार्थ्यांच्या बऱ्याच समस्या जाणून घेतल्या तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली तसेच विद्या इंटरनॅशनल स्कूल येथील टर्फ चे देखील उद्घाटन केले तसेच फुटबॉलचा खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतला. तसेच शालेय विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधताना विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिरचे आयोजन करण्यात येईल असे यावेळी अमित साहेब ठाकरे यांनी सुचवले.
आज सटाणा कळवण त्र्यंबकेश्वर दौरा
दरम्यान नाशिक दौऱ्यावर असलेले अमित ठाकरे आज रोजी सटाणा- देवळा, कळवण, दिंडोरी, हरसुल, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर तालुक्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या परिसरातही भरगच्च कार्यक्रम असून अमित ठाकरे या ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे.
मालेगावात जंगी स्वागत
राज्यातील युवावर्गाला जोडण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचे मालेगावात जल्लोषात स्वागत झाले. पदाधिकाऱ्यांना हात जोडत विद्यार्थ्यांशी त्यांनी हात मिळवला. राज्यस्तरीय विषय पक्षश्रेष्ठी हाताळतीलच आपण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना हात घालू, संघटन वाढवून युवककेंद्री विषय निकाली काढूया, अशी साद घालत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली.