Nashik News : नाशिक-पुणे रोडवर (Nashik Pune Road) पौर्णिमा स्टाॅपच्या पुढे एक महिला व्हॅनच्या धडकेत जखमी (Road accident) झाली होती. जखमी झाल्याने ती रस्त्याच्या कडेला पडून मदतीसाठी याचना करीत होती. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाने थांबून लागलीच मोबाईलवर 112 हा नंबर डायल केला. पुढच्या दहा मिनिटात नाशिक (Nashik) पोलिसांची व्हॅन घटनास्थळी हजार झाली. जखमी महिलेला व्हॅनमध्ये टाकत उपचारासाठी रुग्णालयात (Civil Hospital) दाखल करण्यात आल्याने महिलेचा जीव वाचल्याची घटना समोर आली. 



नाशिक-पुणे महामार्गावर (Nashik) नेहमीप्रमाणे वर्दळ असते. या रस्त्यावर अवजड वाहनासह इतर वाहनांची गर्दी असते. दरम्यान या परिसरात काम करणाऱ्या आरती देवीदास परदेशी या नेहमीप्रमाणे रस्त्यावरून जात होत्या. पायी जात असतांना अज्ञात वाहनाने त्यांना उडवुन दिल्याने अपघातामध्ये परदेशी यांच्या डोक्यास व हातापायास मार लागल्याने गंभीर दुखापत रस्त्याच्या बाजूला पडलेल्या होत्या. यानंतर परदेशी या रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनांना मदतीसाठी बोलावत होत्या. मात्र कुणीही थांबण्यास तयार नव्हते. काही वेळाने पायी जाणारे जागरूक नागरिक अल्ताफ युसूफ शेख यांचे परदेशी यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनीही वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणतेही वाहन थांबण्यास तयार नव्हते. 


दरम्यान शेख यांनी तात्काळ एका रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. कोणत्याही प्रकारे मदत उपलब्ध होत नसल्याने त्यांना घटनास्थळी हजर असलेल्या नागरीकांनी सांगीतले की तुम्ही पोलीसांच्या 112 हेल्पलाईन नंबरवर फोन करा. त्यावेळी त्यांनी हेल्पलाईवर नंबरवर फोन केला असता नियंत्रणकक्षा मार्फंत तात्काळ मुंबईनाका (Mumbai Naka) पेालीस ठाणे हद्दीतील मोबाईलशी संपर्क करून लागलीच अंमलदार यांना घटनास्थळी रवाना केले. हेल्पलाईन मोबईलवरील पोलीस संजय महाजन, संतोष साळवे व भद्रकाली पोलीस ठाणेकडील डेल्टा माबाईलवर चालक पोलीस फरीद शबीर इनामदार, रविंद्र गौतम जाधव असे दहा मिनीटाचे आत घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी रस्त्यावर पडलेल्या अपघातग्रस्त महिलेला तात्काळ मुंबईनाका पोलीसांनी सरकारी वाहनामध्ये टाकुन सिव्हील हाॅस्पटलमध्ये दाखल केले. अपघातग्रस्त महिला हिला वेळीच वैदयकीय मदत मिळवुन देवुन तिला जीवदान मिळाल्याने तिने पोलीसांचे आभार मानले. 


दरम्यान नियंत्रण कक्षामार्फंत हेल्पलाईन नंबरवर मदत मागणारे इसम अल्ताफ युसुफ शेख म्हणाले कि, हाॅस्पीटल व रुग्णवाहिकेला फोन करून मदत मागितली असता मला कोणत्याही प्रकारे मदत मिळाली नाही. परंतु पोलीसांना संपर्क करून मदत मागीतली असता 'पोलीस हे देवासारखे धावुन आले, माझा नाशिक पोलीसांना खुप खुप सॅल्युट' असे उद्गार काढले. पोलिसांनी अशाच प्रकारे नागरिकांना उत्स्फर्तपणे मदत करावी, अशी भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवली. 


नेमकी घटना काय? 
साई वृद्धाश्रमात नोकरी करण्याच्या करणाऱ्या आरती परदेशी या नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी शनिवारी सकाळी पाणी निघाल्या होत्या. त्यावेळी भरधाव जाणाऱ्या काळच्या चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष कर त्यांना धडक दिली. या धडकेत त्या गंभीर जखमी झाल्या. परदेशी यांच्या डोक्याला व हातापायास गंभीर होऊन रक्तस्त्राव होत होता. मात्र कारचालकाने घटनास्थळी न थांबता तेथून पळ काढला. सुदैवाने त्यांना वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने त्यांचे प्राण वाचले.