Aditya Thackeray : शिवसेना (Shivsena) नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा (Shivsamvad Yatra) तिसरा टप्पा आयोजित करण्यात आला होता. परंतु हा दौरा रद्द करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांची प्रकृती खराब असल्यामुळे शिवसंवाद यात्रेचा तिसरा टप्पा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. 



मागील महिन्यात आदित्य ठाकरेंची तोफ नाशिकमध्ये (Nashik) धडाडली. आदित्य ठाकरे यांनी दोन दिवशीय दौऱ्यावर येत नाशिकमध्ये झंझावाती दौरा केला. नाशिक शहरासह जिल्ह्यात मनमाड, नांदगाव परिसर कार्यकर्त्यांचे मेळावे घेत बंडखोर आमदारांचे धाबे दणाणून टाकले होते. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांचा जळगाव दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार ते उद्या जळगाव (Jalgoan) येथे दाखल होणार होते. मात्र आदित्य ठाकरे यांची तब्येत बिघडल्याने तूर्तास हा दौरा रद्द करण्यात आला आहे. याबाबतची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे. 


दरम्यान शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर आदित्य ठाकरे स्वतः मैदानात उतरले आहेत. सुरवातीला त्यांनी निष्ठा यात्रेद्वारे मुंबईतील अनेक भागात दौरे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातही आदित्य ठाकरेंनी वाहनांचा ताफा फिरवल्याचे दिसून आले होते. त्यानंतर महाराष्ट्रभर शिवसैनिकांना एकत्रित करण्यासाठी शिवसंवाद यात्रेचे आईजान करण्यात होते. या यात्रेचा पहिला दौरा हा नाशिकमध्ये करण्यात आला. नाशिक शहरासह जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंना जोरदार प्रतिसाद दिला. यामुळे राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले होते. 


त्यानंतर आता आदित्य ठाकरे जळगाव, मालेगाव, सिन्नरच्या काही भागात दौरा करणार होते. ठाकरेंचा हा दौरा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला होता. उद्या ते जळगाव जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. यामध्ये पाचोरा, धरणगाव, पारोळा, धुळे, मालेगाव, नाशिक असा दौरा करणार होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकहून सिन्नर ला जाणार होते. त्यानंतर सिन्नर हुन भिवंडी शहरात मेळावा होणार होता. मात्र तब्येत व्यवस्थित नसल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान आदित्यजी ठाकरे यांनी जळगांव, मालेगांव, नाशिक, आणि भिवंडीकरांना दिलगिरी व्यक्त केली असून लवकरच दौऱ्याच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील असे सांगितले आहे.


लवकरच पुढील तारखा जाहीर 
आता आदित्य ठाकरे जळगाव, मालेगाव, सिन्नरच्या काही भागात दौरा करणार होते. ठाकरेंचा हा दौरा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला होता. उद्या ते जळगाव जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार होते. यामध्ये पाचोरा, धरणगाव, पारोळा, धुळे, मालेगाव, नाशिक असा दौरा करणार होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नाशिकहून सिन्नर ला जाणार होते. त्यानंतर सिन्नर हुन भिवंडी शहरात मेळावा होणार होता. मात्र तब्येत व्यवस्थित नसल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान आदित्यजी ठाकरे यांनी जळगांव, मालेगांव, नाशिक, आणि भिवंडीकरांना दिलगिरी व्यक्त केली असून लवकरच दौऱ्याच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील असे सांगितले आहे.