Trains Canceled : काही दिवसांवर नवरात्रोत्सव (Navratri 2022) येऊन ठेपला असताना रेल्वे प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागणार आहे. मनमाड (Manmad), भुसावळ, नाशिकहून (Nashik) मुंबईला (Mumbai) जाणाऱ्या काही गाड्या रद्द (Train Canceled) करण्यात आल्याने चाकरमान्यांची धावपळ होणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील रायगड झारसुगुडा स्थानकादरम्यान नवीन चौथ्या ट्रॅकचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील 66 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर भुसावळ (Bhuswal Railway) विभागात येणाऱ्या व जाणाऱ्या 28 प्रवासी रेल्वे गाड्या दहा दिवसांकरता रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. 


मनमाड, भुसावळ, नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची धावपळ यामुळे होणार आहे. भुसावळ, मनमाड, नाशिकहून हजारो प्रवासी मुंबईला जात असतात. अनेकजण व्यवसाय, नोकरी आदी उद्देशाने रोज येजा करीत असतात. मात्र रेल्वे प्रशासनाने दहा दिवसांचा ब्रेक घेतल्याने प्रवाशांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात रायगड झारसुगुडा स्थानकादरम्यान नवीन चौथ्या ट्रॅकचे काम सुरू असल्यामुळे या मार्गावरील 66 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 


या गाड्या बंद राहणार
यामध्ये गाडी क्रमांक 12129/30 पुणे हावडा पुणे एक्सप्रेस, गाडी क्रमांक 12809/10 छत्रपती शिवाजी- महाराज टर्मिनस -सीएसटी, गाडी क्रमांक 12859/60 सीएसटी-हावडा-सीएसटी तसेच गाडी क्रमांम 18029/30 लोकमान्य टिळक टर्मिनस -शालिमार- लोकमान्य टिळक टर्मिनस या गाड्या 28 सप्टेंबर पर्यंत बंद राहतील.तर गाडी क्रमांक 12261/62 सीएसटी - हावडा- सीएसटी 23 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर, गाडी क्रमांक 12221/22 पुणे हावडा पुणे एक्सप्रेस 22 ते 29 सप्टेंबर, गाडी क्रमांक 22846/45 पुणे हावडा पुणे एक्सप्रेस 23 ते 29 सप्टेंबर, गाडी क्रमांक 12 879 80 लोकमान्य टिळक टर्मिनस भुवनेश्वर लोकमान्य टिळक एक्सप्रेस 22 ते 29 सप्टेंबर पर्यंत बंद राहतील. गाडी क्रमांक 20 821 22 पुणे सतरंगाची पुणे एक्सप्रेस 23 ते 29 सप्टेंबर गाडी क्रमांक 12151/52 लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 21 ते 30 सप्टेंबर गाडी क्रमांक 22511/12 लोकमान्य टिळक टर्मिनस कामाख्या लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 25 ते 27 सप्टेंबर, गाडी क्रमांक 22894/93 शिर्डी हावडा शिर्डी एक्सप्रेस 22 ते 01 आक्टोंबर, गाडी क्रमांक 12101 दोन लोकमान्य टिळक टर्मिनस शालिमार लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस 23 ते 29 सप्टेंबर, गाडी क्रमांक 22866/65 लोकमान्य टिळक टर्मिनस पुरी लोकमान्य टिळक टरणस एक्सप्रेस 27 ते 29 सप्टेंबर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 


मनमाड समर एक्सप्रेसला मुदतवाढ 
सध्या सुरू असलेल्या मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई मनमाड उन्हाळी विशेष सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीला एक आक्टोंबर ते 5 जानेवारी 2023 पर्यंत पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे चाकरमाने, विद्यार्थी आणि व्यावसायिकांनी सोयीस्कर होणार आहे. तर गाडी क्रमांक 02102 मनमाड मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि गाडी क्रमांक 02101 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मनमाड ही गाडी आता एक ऑक्टोबर पासून 5 जानेवारी 2023 पर्यंत दररोज तिच्या वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मनमाड सुरवातीला तीन महिने प्रायव्हेट तत्त्वावर मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसच्या धरतीवर मनमाड मुंबई मनमाड समर एक्सप्रेस सुरू करण्यात आली. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन पुन्हा तिसऱ्यांदा या गाडीला मुदतवाढ देण्यात आली असून ही गाडी आता पाच जानेवारी 2023 पर्यंत मनमाड मुंबई मनमाड दररोज धावणार आहे. 


कसारा घाटात बोगी घसरली
मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर मुंबईहून नाशिककडे येणारी मालगाडीची शेवटची बोगी मंगळवार रात्री उशिरा अकरा वाजेच्या दरम्यान कसारा घाटात दोन नंबर बोगद्याजवळ रुळावरून घसरली. यामुळे मुंबईवरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा प्रवासात अडथळा निर्माण झाला होता. या मार्गावरील रेल्वे गाड्या काही काळ उशिराने धावत होत्या. प्रशासनाने सर्व कामगार व यंत्रणा उभी करून युद्धपातळीवर पहाटे चार वाजेपर्यंत रेल्वे बोगी बाजूला करण्याचे काम सुरू केले. बुधवारी सकाळच्या सुमारास घसरलेली भोगी पुन्हा रुळावर आणून मालगाडी इगतपुरीत आणली गेली. सध्या या मार्गावरून रेल्वे वाहतूक सुरळीत चालू झाली आहे,