Trimbakeshwer : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) मंदिरातील शिवपिंडीचा (Shivpind) वज्रलेप निखळल्याची घटना समोर आल्यानंतर घटनेबाबत मंदिर ट्रस्टने पुरातत्त्व विभागाला (Department of Archaeology) पत्र पाठवल्यानंतर पाच दिवसांनी औरंगाबाद (Aurangabad) येथून पुरातत्व विभागाचे पथक पाहण्यासाठी आले. पुरातत्त्व विभागाच्या पाहणीनंतर आठ दिवसात पिंडीच्या वज्रलेपाचे काम करणार असे आश्वासन यावेळी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.


गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलेले त्र्यंबकेश्वर येथील आद्य जोतिर्लिंग (Trimbakeshwer Jotirling) संदर्भात विशेष माहिती समोर आली होती. यामध्ये गर्भगृहात असणार्या शिवपिंडीची झीज झाल्याचे निदर्शनास आले होते. तर काही दिवसांपूर्वी या पिंडीवरील असलेल्या बर्फाचा जमा झालेला गोळा चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर आता गर्भगृहात असलेल्या शिवपिंडीचा वज्रलेप निखळल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने अहवाल तयार करीत पुरातत्व विभागाकडे सोपविण्यात आला होता. 


बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून ओळख असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील भगवान त्रंबक राज्याच्या शिवपिंडीची झीज सुरू झाली आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून या संदर्भातील बातम्या समोर येत होत्या. यामध्ये त्र्यंबक मंदिरातील शिवलिंगातील ब्रम्हा, विष्णू, महेश असे तीन उंचवटे असून त्यातील उंचवट्यावर असलेल्या दगडी कंगोऱ्यावरील टवका काही दिवसापूर्वी निघाला होता. याबाबत स्थानिकांसह पुरोहितांमध्ये चिंता पसरली होती. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट प्रशासन यांनी पंचनामा करून तसा अहवाल त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे आणि भारतीय पुरतत्व खात्याकडे पाठवला होता. त्यानुसार मंगळवारी पुरातत्त्व विभागाचे अधिकारी येथे पाहण्यासाठी आले होते. 


यावेळी पुरातत्व खात्याकडून आलेले अधिकाऱ्यांनी संबंधित शिवपिंडीची पाहणी करत मोजमाप केले. त्याचबरोबर संबंधित त्रंबक मंदिराच्या स्ट्रर्सकडून याबाबत माहिती घेतली तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या दर्शन बारीच्या कामाचेही त्यांनी पाहणी केली दरम्यान पाहणी झाल्यानंतर पुरातत्त्वचे अधीक्षक चावला यांनी सांगितले की वज्रलेपच्या कामासाठी तीन दिवसाची आवश्यकता असून यासाठी गर्भगृहातील दर्शन बंद ठेवावा लागणार आहे त्याचबरोबर पिंडीवर पाणी टाकता येणार नाही हे काम झाल्यानंतर पुढील नव्वद वर्ष तरी काम करावे लागणार नाही पुढील आठ दिवसात या कामाला सुरुवात होणार असून साठी तीन दिवस गाभारा बंद ठेवावा लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 


काय म्हणाले, पुरातत्वीय अधिकारी 
केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी (औरंगाबाद) येथे भेट देऊन पाहणी केली. आता लवकरच पिंडीवर वज्रलेप होणार आहे. भारतीय पुरातत्त्व खाते औरंगाबाद विभागाचे अधीक्षक मिलन चावला यांनी त्रंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाऊन पाहणी केली. त्र्यंबकेश्वर मंदिरातील महादेवाच्या पिंडीचे मूळ स्वरूप तसेच राहील व दर्जेदार पद्धतीने वज्रलेप होईल, याची दक्षता घेणार असल्याचे चावला यांनी सांगितले. त्र्यंबकेश्वर मंदिरातील नंदिकेश्वर महादेवाच्या मंदिरात दर्शनी भागाच्या जाळ्या तुटलेले आहे त्याकडे वेधण्यात आले. वज्रलेप कामाला सुरुवात होई पावतो. तो पर्यंत पिंडीची जास्तीत जास्त दक्षता घेण्यात येणार आहे.