Nashik Year End 2022 : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी गुन्हेगारी (Crime) तर सरत्या वर्षात पाहिलीच. त्याचबरोबर महत्वाच्या विभागातील अधिकारी कसे टेबलाखालून काम करतात हेही सर्वसामान्य नागरिकांना दिसून आले. 2022 या सरत्या वर्षात नाशिक शहरासह जिल्ह्याला अक्षरश पोखरून काढले. लहान कर्मचाऱ्यापासून ते क्लास वन अधिकाऱ्यांपर्यत लाच घेण्याच्या घटना समोर आल्या. पाहुयात या वर्षांतील आढावा... 


सरते वर्ष संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असून या वर्षात अनेक लहान मोठ्या घडामोडी घडल्या. गुन्हे असतील, अपघात असतील याचबरोबर लाचखोरीची (Bribe) प्रकरणे देखील मोठ्या प्रमाणावर नाशिक शहरात समोर आली. यंदा नाशिक (Nashik) मध्ये देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धडाकेबाज कारवाई करत अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेले या सर्व कारवायांचा आकडा समोर आला असून लाच लुचपत विभागाने जवळपास 125 कारवाया वर्षभरात केल्या आहेत. या धडाकेबाज कामगिरीबाबत महाराष्ट्रात नाशिक परिक्षेत्राचा दुसरा क्रमांक लागतो.


लाच लुचपत विभागाने नाशिक परिक्षेत्रात 2022 या वर्षभरात काळात 125 यशस्वी सापळा कारवाया केल्या आहेत आणि चार अन्य भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधात होणाऱ्या कारवायांमध्ये नाशिकचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या काही महिन्यांमध्ये झालेल्या कारवांमधून निदर्शनास आला आहे. दरम्यान नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत नाशिकमध्ये पोलीस विभागात 30, महसूल विभागात 21 जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 15, मराविविकं मध्ये 10, शिक्षण विभागात 04 आदिवासी विकास विभागात 04 आणि खाजगी व्यक्ती 09 कारवाई करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये एकूण 125 कारवाया सापळा रचून केल्या असून या कारवायामध्ये 175 भ्रष्ट अधिकारी गुंतलेले आहेत. या सर्व कारवायांमध्ये वर्ग 01 चे दहा अधिकारी, वर्ग 2 चे 25 वर्ग 3 च3 92 अधिकारी, वर्ग 4 चे दहा शासकीय अधिकारी कर्मचारी आणि इतर लोकसेवक किंवा खाजगी व्यक्ती अशा 38 संशयित आहेत. तसेच अन्य भ्रष्टाचार चे गुन्हे देखील दाखल केले असून 14 शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी विरोधात कारवाई करण्यात आले आहे.


लाच देणे आणि घेणे हा कायद्याने गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्याविरुद्ध विभाग कारवाई करत असतो. शासकीय लोकसेवक त्याचे काम कायदेशीरपणे प्रामाणिकरीत्या करत असेल आणि ते काम बेकायदेशीररित्या करून घेण्यासाठी कोणी त्याला लाच देण्याचा प्रयत्न करत असेल, तेव्हा तो पण एक अपराधाच आहे. ज्या प्रकारे लाच घेण्यासंदर्भात किंवा मागण्या संदर्भात एखाद्या अधिकारी कर्मचाऱ्यांना गुन्हा दाखल होतो. त्याच प्रकारे लाच देण्यासंदर्भात एखाद्या व्यक्तीविरुद्ध लाभ देण्याचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये कायदेशीर कामकाज करून देण्यासाठी कोणी शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही लाचेची मागणी करत असेल. तर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला कळवावे अथवा तक्रार नोंदवावी अशी आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून नागरिकांना वारंवार करण्यात येते.


नाशिक परिक्षेत्रातील महत्त्वाच्या कारवाया
नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता 28 लाख 80 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक
जळगाव महावितरण कार्यालयातील सहाय्यक अभियंता सहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक
नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषदेतील बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता उपविभागीय अभियंता यास चार लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक