Nashik News : राज्यातील आयटीआय संस्थांमधून (ITI) उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या यादीत नाशिकच्या (Nashik) मुलींच्या आयटीआय संस्थेने (ITI Organization) अव्वल स्थान पटकावले आहे. तर विभाग स्तरावर नागपूर (Nagpur) विभागातील चंद्रपूर मधील अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. या निमित्ताने नाशिकचे नाव पुन्हा एकदा राज्यपातळीवर गाजले आहे.


दरवर्षी राज्यातील शासकीय -खाजगी संस्थांना एकत्रित करून संस्थेच्या कामकाजावरून, दरवर्षीच्या अहवालावरून निवड करण्यात येते. राज्यातील उद्योग क्षेत्रातील विविध कामांसाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे आणि त्यासाठी युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सक्षम बनवणाऱ्या शासकीय तसेच खाजगी संस्थांना उत्कृष्ट औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणून सरकारकडून निवडण्यात येते. 2020-21 वर्षासाठी राज्यस्तरावर नाशिक मधील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण प्रथम क्रमांक पटकावला तर विभाग स्तरावर नागपूर विभागातील चंद्रपूर मधील अंबुजा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. 


राज्यात अंदाजित आकडेवारीनुसार 417 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 381 खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या संस्था 134 प्रकारच्या व्यवसायांचे (ट्रेड) चे प्रशिक्षण देतात. या संस्थांमध्ये दरवर्षी सुमारे 1 लाख 50 हजार विद्यार्थी प्रवेश घेत असतात. दरम्यान याच संस्थांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव म्हणून राज्यातील आयटीआय संस्थेची निवड करण्यात येते. उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्य पुरवठा करणे युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन सक्षम बनवणे कौशल्ययुक्त प्रशिक्षण देऊन उत्पादन व इतर सेवा क्षेत्रांमध्ये स्वयरोजगार करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे, कामगारांना योजनाबद्ध प्रशिक्षण देऊन औद्योगिक आस्थापनांचा दर्जा गुणवत्ता व उत्पादन वाढवून या उद्दिष्टांसह राज्यातील शिल्प कारागीर योजना सुरू करणे या सर्व प्रशिक्षण योजनांची उत्कृष्ट अंमलबजावणी करणाऱ्या सर्व संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व संस्थांमध्ये निकोप स्पर्धा घेऊन त्यातून राज्यातील शासकीय तसेच खाजगी उत्कृष्ट संस्थेची निवड करण्यात येते. 


त्यानुसार 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी राजस्तरावर तर विभागीय स्तरावरून सहा औद्योगिक संस्थांची निवड करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या संस्थांमध्ये राजस्थान विभागातील नाशिक मुलींचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तर मुंबई विभागातील जोगेश्वरीतील लालजी मेहरुत्रा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने तित्वीय आणि नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने तृतीय क्रमांक पटकावला आहे. 


राज्यातील या आयटीआय संस्थाची निवड 
राजस्तरीय पुरस्काराप्रमाणेच विभागीय स्तरावरील संस्थांचा गौरव करण्यात येतो. त्यानुसार नागपूर विभागातील चंद्रपूर जिल्ह्यातील अंबुजा अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर औरंगाबाद विभागातील जालना जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने दुसरा पुणे विभागातील कोल्हापूर मधील स्नॅक संचलित स्वर जवान मलजी गांधी खाजगी संस्थेने तिसरा, नाशिक विभागातील संगमनेर मधील लोकपंचायत रुरल टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या खाजगी संस्थेने चौथा, मुंबई विभागातील ठाणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने पाचवा, अमरावती विभागातील अमरावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सहावा क्रमांक पटकावला आहे. 


नाशिक मुलींची आयटीआय संस्था 
राज्यात उत्कृष्ट ठरलेल्या नाशिकमधील मुलींच्या आयटीआयची प्रवेश क्षमता 420 एवढी आहे. मुलींच्या आयटीआय औद्योगिक संस्थेत एकूण 11 ट्रेंड असून 24 युनिट्स विद्यार्थिनीसाठी असल्याची माहिती उपप्राचार्य मोहन तेलंगी यांनी दिली. यामध्ये फॅशन डिझायनिंग्स, कटिंग अँड स्युईंग, इंटेरिअर डेकोरेशन किंवा बेसिक कॉस्मिटॉलॉजी अशा ट्रेडसोबतच इंजिनिअरिंग आणि आयटीसाठीच्या बॅचचाही समावेश आहे. विशेष म्हणजे इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात मेकॅट्रॉनिक्ससारखे टेक्निकल ट्रेडदेखील मुली सहज आत्मसात करत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थिनींसाठी सीएसआर निधीतून स्मार्ट क्लासरूम, लॅब उभारणी केली आहे. याशिवाय प्लेसमेंटसाठीही विविध कंपन्यांशी संस्थेने करार केले आहेत. विद्यार्थिनींच्या शिक्षणाबरोबरच सॅनिटरी नॅपकिनचे युनिट्स उभारून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्याचे त्यांनी सांगितले.