Nashik Rain Update : नाशिकसह (Nashik) जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा कायम असून सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट व मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तर रविवारी झालेल्या जोरदार पावसामुळे विज पडून जिल्हा (Lightning Strike) जवळपास 16 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.


गेल्या महिनाभरापासून नाशिकसह जिल्हाभरात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) धुमाकूळ घातला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. सातत्याने होत असलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे (Crop Damage) मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. त्याचबरोबर पशुधनही या अवकाळी पावसात मृत्युमुखी पडत असल्याने शेतकऱ्यावर दुहेरी संकट कोसळले आहे. रविवारी झालेल्या पावसात जिल्ह्यातील 16 जनावरे मृत्युमुखी पडली असून यात 12 शेळ्या तर तीन गाई आणि एक म्हशीचा समावेश आहे. 


दरम्यान सिन्नर तालुक्यातील (Sinnar) नांदूर शिंगोटे येथे रविवारी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून आदिवासी बांधवांच्या 12 शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. तर याच कुटुंबाच्या पाच शेळ्या या अत्यवस्थ अवस्थेत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या आदिवासी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. तर निफाड तालुक्यात म्हाळसाकोरे येथे शेताजवळ बांधलेल्या दोन गाईंवर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सायंकाळच्या सुमारास वादळ वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाल्यानंतर वीज पडून दोन गाईंचा मृत्यू झाला आहे. संगमनेरे हे जनावरे शेतातून गोठ्यात बांधण्यासाठी जात होते. तितक्यात जोराची वीज कडाडली आणि त्यांच्या नजरेसमोरच दोन गाईंचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. 


तर बागलाण (Baglan) तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक शेती पिकांचे नुकसान झालेच आहे. दरम्यान रविवारी झालेल्या पावसात निरपूर येथील शेतकरी उत्तम सजन सूर्यवंशी यांच्या गोठ्यावर वीज पडून एक म्हैस व गाय ठार झाली. दरम्यान अवकाळी पाऊस अजूनही बरसतो आहे. तर उन्हाचा तडाखा देखील वाढत असून दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच पशुधनाचे देखील नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. 


अवकाळी पावसाने शेतकरी संकटात 


गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसाने नाशिकसह (Nashik) जिल्ह्याला चांगलंच हादरवून सोडले आहे. दिवसाआड होत असलेल्या गारपिटीमुळे शेतकरी  (Crop Damage) मेटाकुटीला आला आहे. काल सायंकाळी देखील नाशिक शहरासह जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी बरसत (Stormy Wind) असल्याने नागरिकांसह शेतकरी हतबल झाला आहे. मार्च महिन्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे अतोनात नुकसान झाले होते. आधीच कांदा, द्राक्ष, डाळिंब, गहू, मका आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.