Nashik Crime : नाशिकमध्ये (Nashik) वाहन तोडफोडीचे सत्र सुरुच असून सलग दुसऱ्या दिवशी गावगुंडांचा हैदोस पाहायला मिळाला आहे. नाशिकरोड भागात आजही मध्यरात्री फोडल्या गाड्याच्या काचा फोडण्यात आल्या असून धोंगडे मळा परिसरातील चार ते पाच वाहन फोडण्यात आली आहे. विहितगाव येथील घटनेला काही तास उलटत नाही तोच पुन्हा वाहने तोडफोडीची दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
नाशिक शहरातील गुन्हेगारीचे (Nashik Crime) सत्र थांबायचं नाव घेत नसून कधी कोयता गँगची दहशत तर कधी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांची दहशत सुरुच आहे. परवा रात्री विहितगाव परिसरात गावगुंडांकडून रस्त्यावरील चार गाड्यांची कोयत्याने (Koyata Gang) तोडफोड करण्यात आली तर एका अपार्टमेंच्या पार्किंगमधील वाहनांची जाळपोळ करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच नाशिकरोड (Nashik Road) परिसरातीलच धोंगडे मळा परिसरात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. 24 तासांत दुसरी तोडफोडीची घटना घडली असून या आधी सिडको परिसरात वाहनांची तोडफोड झाली होती. टवाळखोर दहशत माजवत असताना नाशिक पोलीस करताय काय? पोलिसांचा गुन्हेगारीवर अंकुश नाही का? असाच प्रश्न सध्या नागरिक उपस्थित करत आहेत.
दरम्यान नाशिक शहरात (Nashik Crime) वारंवार कुठल्या ना कुठल्या भागात अशा घटना घडत आहेत. काल रात्रीच्या घटनेत स्थानिक नागरिकांनी पोलिसांशी संपर्क केल्याचे सांगितले. 'रात्री आम्ही पोलिसांना गावगुंड कुठून जाताय, हे सांगत होतो, मात्र पोलिसांनी लक्ष दिले नाही.' कोयते, तलवारी घेऊन 8 ते 9 जण दुचाकीवरुन धुडगूस घालत होते. याबाबत आम्ही पोलिसांना सांगितले की, गुंडाचा पाठलाग करा म्हणून, मात्र आमच्या वाहनांची क्लजप्लेट खराब असल्याचे गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी सांगितल्याची माहिती नागरिकांनी दिली. अखेर काही स्थानिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र गुंडांनी पकडण्यात स्थानिकांनी अपयश आले.
शहर पोलिसांच्या बदल्या
दुसरीकडे वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिक शहर पोलीस दलात फेरबदल केले आहेत. परिमंडळ दोनच्या डिसीपी आणि एसीपीची बदली करण्यात आली असून डिसीपी चंद्रकांत खांडवी यांची मुख्यालयात तर एसीपी अंबादास भुसारे यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. मोनिका राऊत यांच्याकडे आता परिमंडळ दोनच्या डिसीपीचा पदभार तर आनंदा वाघ हे नाशिकरोड विभागाचे नवे एसीपी असणार आहेत. आता शहर पोलिसांच्या फेरबदलानंतर तरी गुन्हेगारी आटोक्यात येणार का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
टवाळखोरांची गय केली जाणार नाही ....
नाशिकमध्ये मध्यरात्री पुन्हा गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ झाल्याची घटना समोर आली. नाशिकरोडच्या विहितगाव परिसरात युवकांनी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये काही युवकांनी कोयता मिरवत गाड्यांची तोडफोड देखील केली. त्यानंतर काल रात्रीदेखील अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली. विहितगावच्या घटनेनंतर दादा भुसे म्हणाले की, नागरिकांना मी शांततेचं आवाहन करतो. या समाज कंटकांवर कडक कारवाई करण्यात येईल. सीसीटीव्हीच्या आधारे ओळख पटली असून टवाळखोरांची गय केली जाणार नाही, पोलिस आयुक्त यांच्याशी बोललो असून ताबडतोब संशयितांचा शोध घेण्याचा आदेश दिला असल्याचे दादा भुसे म्हणाले.
ईतर संबंधित बातम्या :