Nashik Crime : नाशिक शहरातील सिडको भागात झालेल्या खुनाच्या घटनेतील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लाईव्ह आल्यांनतर मयत परशुराम याच्या मित्राने संशयितास लाईव्ह दरम्यान शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरून संशयितांनी हल्ला केला. मात्र परशुराम याने मध्यस्थी करत असताना संशयितांपैकी एकाने त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकल्याने त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी काही तासांत संशयितांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नाशिक शहरातील सिडको परिसरात मयत परशुराम हा आपल्या मित्रांसह एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेला होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र संग्राम शिरसाट हा देखील होता. संग्राम शिरसाठ आणि वैभव शिर्के यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. आणि याच कारणावरून हे जेवण करत असताना वैभव शिर्केसह संशयितांनी हॉटेलात येऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. परशुराम प्रतिकार करत असताना संशयितांनी हॉटेल बाहेर असलेले पेव्हर ब्लॉक त्याच्या डोक्यात टाकल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. मित्रांनी त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र अतिरक्तस्रावाने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु त्याचा मृत्यू झाला.
भांडण सोडवल पण...
याप्रकरणी फिर्यादी तेजस रामदास अंबालकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला होता. अंबड पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मंगळवार 25 एप्रिल रोजी रात्री साडे नऊवाजेच्या सुमारास फिर्यादी सनी उर्फ अभिषेक हिरामण बच्छाव, परशुराम बाळासाहेब नजान, रोहीत पाटील, संग्राम शिरसाट हे सिडको परिसरातील सावतानगर येथील प्रत्यांश हॉटेल येथील वाडयात जेवत होते. याचवेळी गिल्या उर्फ वैभव शिर्के हा इन्टाग्रामवर लाईव्ह असतांना त्यास संग्राम शिरसाट याने शिवीगाळ केली होती. त्याचा शिर्के याला राग आल्याने त्याने संग्राम शिरसाट यांच्यासोबत वाद करून त्यास मारहाण केली. परशुराम याने मध्यस्थी करून शिर्के आणि त्याच्या साथीदारांना तेथून हाकलून दिले.
सोशल मीडियावरील लाईव्ह...
मात्र शिर्केचे साथीदार परत जाताना शिरसाट याने वेदांत गिरी याच्या पाठीत कोयता मारला. त्याचा राग आल्याने शिर्के हा त्याचे साथीदारांसोबत हातामध्ये दगड, पेवर ब्लॉक घेवून पळत आला. संग्राम आणि परशुराम यांना त्यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. संग्राम तेथून पळून गेला. शिर्केच्या साथीदारांपैकी दोघांनी त्यांच्या हातातील पेवर ब्लॉकने परशुरामच्या डोक्यात जोरात मारूल्याने तो जमिनीवर कोसळला. दरम्यान इतर संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तो मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर घटनेची माहिती पोलीस ठाण्यात प्राप्त होताच लागलीच घटनास्थळी पोलीस पथक पोहचले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस सूरज बिजली यांनी तात्काळ पोलिसांची वेगवेगळी पथके तयार केली.
काही तासांत संशयितांना अटक
तयानुसार पोलीस पथकांनी तातडीने तपासचक्रे फिरवत गुन्हयातील संशयित ओंकार दिलीप बागुल, वैभव गजानन शिर्के, अमोल बापू पाटील यांना आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. या गुन्हयात एकूण आठ विधी संघर्षग्रस्त बालक असून त्यांना ताब्यात घेतले आहे. सदरचा खून आरोपीतांनी कोणत्याही पुर्ववैमनस्यातून केला नाही. संग्राम शिरसाट याने गुन्हयातील मुख्य संशयित शिर्के हा इन्टाग्रामवर लाईव्ह असताना आठ दिवसापूर्वी त्याला शिवीगाळ केली होती. त्या कारणावरून ही घटना घडली.