Maharashtra Cabinet Expansion : भाजपचे (BJP) जेष्ठ नेते तसेच खान्देशातील भाजपचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन (Girish Mhajan) पुन्हा एकदा शिंदे फडणवीस (CM eknath Shinde) सरकारच्या काळात पुन्हा एकदा मंत्री पदी वर्णी लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकचे (Nashik) संकटमोचक म्हणून गिरीश महाजन यांच्याकडे पाहिले जात आहे. 


विद्यार्थी संघटनेपासून सुरवात 
गिरीश दत्तात्रय महाजन हे जळगाव (Jalgoan) जिल्ह्यातील जामनेर तालुक्याचे आमदार आहेत. ते मतदारसंघातून तब्बल सहा वेळा निवडून आले आहेत. गिरीश महाजन यांचा जन्म १७ मे 1960 साली जामनेर शहरात झाला. गिरीश महाजन यांनी जामनेरच्या बीए महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. याच काळात ते एबीव्हीपी या संघटेनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समस्यांवर काम करू लागले. तेव्हापासून त्यांनी भाजपसोबत काम करण्यास सुरवात केली. अगदी सामान्य कार्यकर्ता ते त्यांनी मंत्रिपदापर्यंत मजल मारली. 


राजकारणात प्रवेश 
गिरीश महाजन यांनी विद्यार्थी संघटनेत काम करत असल्यापासून भाजपमध्ये जाण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार ते 1980 च्या सुमारास त्यांनी भाजपच्या युवा मोर्चाच्या तालुक्याध्यक्ष पदाची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर पहिली निवडणूक त्यांनी 1992च्या सुमारास जामनेर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लढवत यशही मिळवले. त्यानंतर पुढील तिचतीनच वर्षात गिरीश महाजन यांना 1995 मध्ये भाजपचे तिकीट मिळाले, अन जामनेर विधानसभा निवडणूक लढवली. पहिल्याच निवडणुकीत ते भरगोस मतांनी निवडणूनही आले. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी मागे वळून पहपाहिले नाही.. 2014मध्ये ते पाचव्यांदा निवडून आल्यानंतर त्यांना थेट देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात जलसंपदा मंत्री म्हणून संधी मिळाली. 


खान्देशातील महत्वाचा चेहरा 
गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते सतत देवेंद्र फडणवीस यांच्या कोणत्याही कार्यक्रमात सोबत असतात. शिवाय जळगाव जिल्ह्यात भाजपचा आश्वासक चेहरा म्हणून गिरीश महाजन यांच्याकडे पाहिले जाते. तत्पूर्वी एकनाथ खडसे यांचे विशेष प्रस्थ जळगाव जिल्ह्यावर होते. मात्र मागच्या निवडणुकांपूर्वी खडसे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हातावर  बांधल्याने गिरीश महाजन यांचा रस्ता साफ झाला. त्यामुळे गिरीश महाजन यांचे भाजपमध्ये आणखी वजन वाढले. आत नव्याने होत असलेल्या मंत्री मंडळ विस्तारात स्थान मिळाल्याने पुन्हा एकदा खान्देशात मंत्री पद मिळाले आहे. 


नाशिकचे पालकमंत्री?
दरम्यान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारच्या काळात गिरीश महाजन हे नाशिकचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यावेळी नाशिकचे संकटमोचक म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. आत नव्याने झालेल्या मंत्री मंडळ विस्तारात वर्णी लागली असून त्यांनी आज मंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे ते पुन्हा नाशिकचे पालकमंत्री होणार का? याकडेही लक्ष लागून आहे. 


गिरीश महाजन अनेक वादात 
गिरीश महाजन यांचे व्यक्तिमत्व मनमोकळे असले तरी महाजन अनेकल्ड वादात सापडले आहेत. मँट्रिओ असताना एका शाळेत ते रिव्हाल्वर घेऊन गेल्यामुळे चर्चेचा विषय झाला होता. तसेच विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्याशी शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. तर अनेक कार्यक्रमात ते डान्स करतानाही आढळून आले आहेत.