Maharashtra Cabinet Expansion : आज महिन्यानंतर अखेर मंत्री मंडळाचा विस्तार (Maharashtra cabinet Exapansion) होत असून नाशिक (Nashik) दोन आमदार शिंदे गटात (CM Eknath Shinde) आहेत. मात्र यापैकी दोन वेळा मंत्री पद भूषविलेले दादा भुसे (MLA Dada Bhuse) यांची तिसऱ्यांदा मंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता असली तरी एकेकाळचे मनसैनिक आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक असलेले सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांचा मात्र जवळपास पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वाखालील राज्य सरकारचा अखेर आज सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) होणार आहे. शिंदे गटाचे समर्थक आमदार त्यांच्या मतदारसंघांमधून मुंबईत दाखल झाले आहेत. तर भाजपचे संभाव्य मंत्रीही मुंबईत दाखल झाले आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 18 मंत्री आज शपथ घेणार आहेत. शिंदे गटाच्या नऊ तर भाजपच्या 9 मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यामंध्ये आमदार व ठाकरे सरकारच्या काळात मंत्री राहिलेले मालेगाव बाह्यचे आमदार दादा भुसे यांचे नाव निश्चित झाले आहे.
दरम्यान शिंदे गटाकडून नऊ नवे निश्चित असल्याचे समजते आहे. मात्र यात आमदार सुहास कांदे यांचे नसल्याने चर्चाना उधाण आले आहे. गेल्या दोन महिन्यात राज्यात मोठ्या राजकीय उलाढाली झाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतुन बाहेर पडत नवा गट स्थापन केला. यात नाशिकमधून सर्वात पहिले नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी शिंदे गटात सहभाग घेत सर्वांनाच आर्श्चयाचा धक्का दिला. सुहास कांदे हे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. उद्धव ठाकरे यांच्या मार्दर्शनाखाली त्यांनी नांदगावसह जिल्हाभरात शिवसेना बळकट करण्याचे काम केले. मात्र त्यानंतर शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर आमदार सुहास कांदे यांनी देखील शिंदे गटाला पाठींबा देत मनातली खदखद बाहेर काढली.
दरम्यानच्या दिवसांत शिवसेना (Shivsena) आणि आमदार सुहास कांदे यांच्यात अनेकदा वाढी निर्माण झाले. त्यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी नाशिकसह मनमाडमध्ये शिवसंवाद दौरा केला. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि आमदार सुहास कांदे यांच्यात चांगलेच वॉर पाहायला मिळाले. तर त्यानंतर काहीच दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष नाशिक दौरा केला. यात मालेगाव, नांदगाव त्यांनी भेटी दिल्या. या सर्व प्रकरणावरून आमदार सुहास कांदे यांची मंत्रिपदाला वर्णी लागेल या आशा पल्लवित झाल्या.
त्यानंतर शिंदे गट आणि भाजप पक्षाने राज्यात सरकार स्थापन केले. तब्बल दिवसांनंतर आज मंत्री मंडळाचा विस्तार होत असून यामध्ये शिंदे गट आणि भाजप मिळून अठरा मंत्री शपथ घेणार असल्याचे समजते. मात्र सध्या नावे जाहीर झालेल्या यादीमध्ये मात्र सुहास कांदे यांचे नाव नसल्याचे मंत्री पदाचा पत्ता कट झाल्याचे समोर येत आहे. मात्र अद्यापही मंत्री मंडळाबाबत निश्चित नसल्याने शिंदे गटाकडून नक्की कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.