Igatpuri Murder Case : जमिनीच्या वादातून इगतपुरी (Igatpuri) येथे 2018 साली तिहेरी हत्याकांड (Trippal murder Case) घडले होते. या घटनेने संपूर्ण तालुका हादरला होता. अखेर या गाजलेल्या तिहेरी हंत्याकांडातील संशयित आरोपी सचिन चिमटे यास जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावण्यात आली असून तीन लाख रुपयांचा दंडही सुनावण्यात आला आहे.
दरम्यान, या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील खेड ग्रामपंचायत हद्दीतील माळवाडी परिसरातील ग्रामस्थांनी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. तसेच वेगवेगळ्या कलमाखाली दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपीला पोलिस बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले. यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या दालनाबाहेर मोठी गर्दी झाली होती.
जिल्हा व सत्र न्यायाधीश एम व्ही भाटिया यांनी या खटल्या संदर्भात दिलेली माहिती अशी, इगतपुरी तालुक्यातील माळवाडी गावात तरुणाने एकाच कुटुंबातील तिघांवर चाकूने वार करत त्यांची निर्घृण हत्या केली होती. (दि. 30 जून 2018) रोजी घडलेल्या घटनेने इगतपुरी तालुकायसह नाशिक जिल्हा हादरला होता. या दिवशी माळवाडी येथे सकाळच्या सुमारास संशयित आरोपी सचिन गणपत चिमटे याने नात्याने चुलत भावबंद असलेल्या घरातील तीन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. इतका शिकलेला असूनसुद्धा तुला नोकरी मिळत नाही, याबाबत वारंवार डिवचल्याचा राग मनात ठेवून हे हत्याकांड घडविल्याची कबुली संशयित आरोपीने पोलिसांपुढे दिली होती. या घटनेत हिराबाई शंकर चिमटे, सून मंगला गणेश चिमटे, नातू रोहित हे ठार झाले होते.
दरम्यान या संदर्भातील खटल्याबाबत जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. आईवेळी सरकारी पक्षातर्फ़े जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी एकूण १२ साक्षीदार तपासले. पुराव्याअंती न्यायालयाने संशयित आरोपीस प्रत्येक खुनाकरिता मरेपर्यंत जन्मठेप अशी एकूण चार जन्मठेपेच्या शिक्षा सुनावली आहे. तसेच संशयित आरोपीस 03 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. सदर दंडाची रक्कम मृतांच्या नातेवाईकांना देण्याचा आदेश न्यायालयाने पारित केला आहे.
जमिनीच्या वादातून तिहेरी हत्याकांड
चिमटे कुटुंबियात असलेल्या जमिनीचा वाद आणि संशयित सचिन चिमटे यास शिक्षणावरून दिले जाणारे टोमणे यातून हे तिहेरी हत्याकांड घडविल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. संशयित आरोपी सचिन याचे बारावी पर्यंत शिक्षण झाले होते. या खुनाचे कारण पोलिसांपुढे सांगताना आपणास नेहमी ‘तूू इतका शिकला सवरलेला असताना तुला नोकरी मिळत नाही’ या सततच्या टोमण्याने व्यथित होऊन सदर गुन्हा झाल्याची पोलिसांनी त्यावेळी दिली होती.