Nashik Shivsena : शिवसेनेचे (Shivsena) पदाधिकारी निलेश उर्फ बाळा कोकणे (Bala kokane) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी सोमवारी एमजी रोडवरील (Nashik MG road) यशवंत व्यायाम शाळेजवळ रात्री पावणेअकराच्या सुमारास हल्ला केला होता. या हल्ल्यात कोकणे हे जबर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Sttaion) पाच संशयित हल्लेखोराविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


एकीकडे राज्यात शिवसेना व शिंदे सेना (Shinde Sena) यांच्या घमासान सुरु असताना नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. शहरातील एम जी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेजवळ हि घटना घडली होती. सोमवारी रात्रीच्या सुमारास नाशिक विधानसभा प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे (Bala Kokane) हे दुचाकीवर असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या धारदार शस्राने हल्ला केला. यात कोकणे हे गंभीर जखमी झाले आहेत. 


शिवसेना कार्यालयातून समोर साडेदहा वाजेच्या सुमारास कोकणे हे त्यांच्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांच्या मागावर दोन दुचाकीद्वारे हल्लेखोर होते. चार ते पाच हल्लेखोरांकडून पाठीमागून धारदार व टणक लोखंडी वस्तूने कोकणे यांच्यावर प्रहार केला. हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच भद्रकाली सरकार वाडा पोलीस ठाण्याची पथके घटनास्थळी दाखल झाली. मंगळवारी पोलिसांनी शालिमार पासून तर थेट घटनास्थळापर्यंत रस्त्यावर असलेल्या विविध आस्थापनांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले, काही फुटेजमध्ये अस्पष्टपणे दुचाकी कैद झाले आहेत. मात्र रात्रीच्या अंधारात संशोतांचे चित्रीकरण स्पष्ट झाले नसल्याने सीसीटीव्ही फुटेज वरून पोलिसांना त्यांचा थांगपत्ता काढणे अवघड झाले आहे. दरम्यान कोकणे यांनी दिले जाबाबू व फिर्यादीवरून अज्ञात हल्ले करून विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी सांगितले 


आदित्य ठाकरे नाशिकमध्ये 
दरम्यान नाशिकच्या दोन आमदारांपाठोपाठ आता खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनीही साथ सोडल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेनेतील पडझड रोखणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बंडखोरांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Additya Thakaray)आज नाशिकमध्ये आहेत. या निमित्ताने आज शिवसेनेचा मेळावा होणार असून शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शिवसेना कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन या बैठकीत गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या पक्षांतर्गत घडामोडींविषयी चर्चा करण्यात येणार आहे.