Nashik Crime : नाशिक पोलिसांनी (Nashik Police) पुन्हा एकदा धाडसी कामगिरी केली असून शहरातील एका घरफोडीच्या गुन्ह्यांचा शोध नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेला लावण्यात यश आले आहे. चोरीचे सोने विकत घेण्यात दोन सराफ व्यवसायकांचा समावेश असल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.


नाशिक पोलिसांनी (Nashik) घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या दोघा सराईत चोरांकडून आणखी एका मोठ्या घरफोडीची उकल झाली आहे. उपनगर येथील सोहनलाल रामानंद शर्मा यांच्या घरातून चोरलेली 18 लाख रुपयांची दागिने गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या कारवाई जप्त करण्यात आले आहेत. चोरीचे सोने विकत घेण्यात दोन सराफ व्यवसायकांचा समावेश असल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी रोहन संजय भोळे, ऋषिकेश मधुकर काळे यांनी जय भवानी रोडवरील रहिवासी संजय ईश्‍वरलाल बोरा यांच्या घरात दहा जुलैला भर दिवसा घरफोडी करून 17 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली होती. 


याप्रकरणी शहाणेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हे दागिने सराफ बाजारातील श्री लक्ष्मी केदार ज्वेलर्स मध्ये विक्री केल्याचे सांगितले. लक्ष्मी केदार ज्वेलर्सचे मालक राजेंद्र ज्योतिबा घाडगे यांच्या चौकशीतून शहाणे गत पंधरा वर्षापासून सोने-चांदी खरेदी विक्री करण्यासाठी येत असल्याचे सांगितले.  त्याने वेळोवेळी सोने व चांदी वितळवून लगड केली. या कारवाई चार किलो चांदी व 16 लाख रुपयांचे 385 ग्राम सोन्याचा तब्बल 17 लाख 86 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 


सदर गुन्ह्यात चोरट्यांनी वापरलेली कार सीसीटीव्ही कैद झाल्याने पोलिसांनी कारची माहिती हे त्यावरून दोघांना साफरचंद दत्त मंदिर रोड परिसरात पकडले होते. दरम्यान आठ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमाना दोघांनी मिळून जय भवानी रोड वरील रहिवासी सोहनलाल शर्मा यांच्या घरातील घरपोडी करून तेरा लाखांचा ऐवज लंपास केल्याची कबुली दिली होती. पोलिसांनी तपास करून रोहन भोळे यांच्याकडे दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्यांनी ते जेलरोड येथील ओळखीचा सराफ व्यावसायिक तुषार शहाणे याला विक्री केल्याचे सांगितले.


तसेच सदर गुन्ह्यात वापरलेली मारूती कंपनीची स्विफ्ट कारसह सुझुकी कंपनीची सफेद रंगाची ऍक्सेस मोपेड यापुर्वीच जप्त करण्यात आलेली आहे. सदर संशयिताकडुन आजपर्यंत गुन्हयात चोरीस गेलेला मुद्येमाल व गुन्हा करण्यासाठी वापरलेली 3 वाहणे असा एकुण 50 लाख 24 हजार 804 रुपये किमंतीचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची कामगीरी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे संजय बारकुंड, सहा. पोलीस आयुक्त वसंत मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या पथकाने कर्मचाऱ्यांनी केली आहे.