Nashik News : पर्यटकांच्या (Tourist) हुल्लडबाजीमुळे बंद करण्यात आलेले नाशिकची पर्यटनस्थळे (Nashik) पुन्हा एकदा खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे या विकेंडला पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र वनविभागाने (Nashik Forest) घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास थेट कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. 


त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer), इगतपुरीसह (Igatpuri) नाशिक तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पावसाळी सहलींना ऊत आला होता. शहराजवळील पहिने, त्र्यंबकेश्वर, दुगारवाडी, इगतपुरीतील भावली आदींसह जिल्ह्यातील इतर पर्यटनस्थळांवर अतोनात गर्दी झाली होती. तर पहिने येथील पर्यटकांच्या हाणामारीचा विडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. तर त्या पूर्वी देखील पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे इतर पर्यटक हैराण झाले आहोत. या पार्श्वभूमीवर नाशिक वनविभागाने पर्यटनस्थळांवर बंदी घातली होती. मागील आठवडा अनेक पर्यटन स्थळे बंद होती. अखेर हि पर्यटनस्थळे पुन्हा एकदा खुली करण्यात आली आहेत. 


जुलैच्या पाहल्या आठवड्यात झालेल्या पावसाने शहरासह जिल्ह्यातील पर्यटनस्थळे खुलून गेली आहेत. यामुळे पर्यटकांना नाशिकचे ‘कोकण’ म्हणून ओळख असलेले त्र्यंबकेश्वर भुरळ घालू लागले आहे. पावसाळी सहलींसाठी शहरवासीयांची पावले आता या कोकणाकडे वळू लागली आहे. त्र्यंबकेश्वर इगतपुरी सह परिसरात हिरवा शालू पांघरला आहे. निसर्ग सौंर्दयाची उधळण झालेल्या सह्याद्री पर्वतरांगेवरून फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे वाहू लागले आहे. या निसर्गसौंदर्याचे पर्यटकांना आकर्षण असून यामुळे पर्यटनस्थळांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नाशिकसह राज्यातील अनेक भाविक त्र्यंबकेश्वर येथील देवदर्शन आटोपून पावसाळी सहलींचा आनंद या भागात लुटताना दिसत आहेत. 


पर्यटन करा पण जपून!
दरम्यान नाशिक वनविभागाने बंद करण्यात आलेली पर्यटन स्थळे खुली केली आहेत. मात्र यापुढे पर्यटनस्थळांवर हुल्लडबाजी खपवून घेतली जाणार नाही. यासाठी प्रशासनाने नियम घालून दिले आहेत. पर्यटनस्थळी पर्यटकांनी मद्यपान व धूम्रपान करून हुल्लडबाजी करू नये, वनअधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटकांनी या सूचनांचे पालन करावे अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा वनविभागाकडून देण्यात आला आहे. 


अंजनेरी परिसर खुलला!
नाशिक - त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या अंजनेरी पर्वत बहरला असून येथील परिसर पावसाळी सहलींसाठी प्रसिध्द आहे. या मार्गावर असलेल्या घाटाच्या दुतर्फा असलेले अंजनेरीचा उंचचउंच डोंगर पावसाळ्यात धुक्यात हरवलेला असतो. तसेच या ठिकाणी उलटा धबधबा देखील पर्यटक आकर्षित करत असतो. पाऊसधारांचा वर्षाव अंगावर झेलत पर्यटक फोटोंची हौस भागविताना दिसतात. 



हरसूल वाघेरा घाटाचे सौंदर्य बहरले! 
नाशिकपासुंन ३० किलोमीटर अंतरावर असलेल्या हरसूल वाघेरा घाट सध्या हिरवाईने नटला आहे. घाट सुरु झाल्यापसून पर्यटकांना दाट धुक्याच्या नगरीत आल्याचे जाणवते. घाट सुरू झाल्यापासूनच अनेक नागमोडी वळणे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक वळणावर पर्यटक थांबतातच. तसेच हा घाट वाघेरा पाडा ते नाकेपाडापर्यंत सात किलोमीटरचा आहे. वनौषधींसाठी घाटाचा परिसर प्रसिद्ध आहे. मात्र अनेकदा पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका अधिक असतो.